Vishal Aditya Singh On Shweta Tiwari : अभिनेता विषय आदित्य सिंग आणि श्वेता तिवारी यांच्या अफेअरच्या चर्चा काही महिन्यांपासून होत आहेत. अशातच आता अभिनेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विशाल आदित्य सिंग काय म्हणाला?
विशाल आदित्य सिंगनं त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. त्यानं श्वेता तिवारीसोबतच्या अफेअरच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली. श्वेता तिवारीसोबत रिलेशनशिपच्या अफवांबाबत विशाल म्हणाला, ‘हे सोशल मीडिया आहे. इथे कोणीही काहीही बोलू शकतं. यामुळे, ज्यांना काही बोलण्याचा अधिकार नाही असे लोकही बोलत आहेत.’
Savita Malpekar : ‘तो सीन करताना माझे पती आयसीयूमध्ये सिरीयस होते’, सविता मालपेकरांनी सांगितला ‘देऊळ बंद २’ सिनेमाच्या शूटिंगचा प्रसंग
टेलीचक्करशी बोलताना, विशाल आदित्य सिंगनं श्वेतासोबतच्या अफेअर आणि लग्नाच्या अफवांवर नाराजी व्यक्त केली आणि ट्रोलर्सवर टीका केली. अभिनेता म्हणाला की, जर कोणी पुढे येऊन या सगळ्याबद्दल बोललं, तर तो त्यांची चांगलीच खरडपट्टी करेन. विशाल म्हणाला, ‘जर कोणी म्हणालं की, मी गोरेगाव फर्स्ट डेपोसमोर उभा आहे, तर मी त्यांना तिथेच थांबायला सांगेन. मी तिथे येईन आणि मग मजा येईल.’
बॉलिवूड स्टार्ससोबत पहिली भेट अन् वर्षा उसगांवकर यांच्यासोबत असं काय घडलं ?
विशालनं सांगितलं की, श्वेता तिवारी त्याची खूप चांगली मैत्रीण आहे. अभिनेत्रीला ‘आई’ म्हणायलाही त्याची काहीच हरकत नाही. विशाल म्हणाला, ‘श्वेता तिवारी माझी इतकी चांगली मैत्रीण आहे की, तिला तिवारीजी म्हणायला मला काहीच अडचण वाटत नाही. आमची मैत्री इतकी घट्ट आहे की, तिला ‘आई’ म्हणायला मला काही वाटत नाही.’ अभिनेता पुढे म्हणाला की, हत्ती चालत राहतो आणि कुत्रे भुंकत राहतात. लोकांना काहीही म्हणूदे, पण त्याचा आमच्या नात्यावर काहीही परिणाम होणार नाही.
Zee Marathi Serial : ‘Goodbyes Are Tough!’ ‘झी मराठी’ची लोकप्रिय मालिका लवकरच गुंडाळणार गाशा, अभिनेत्रीनं व्यक्त केल्या भावना
श्वेता तिवारीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास, अभिनेत्री दोन मुलांची आई आहे. तिची मुलगी, पलक तिवारीनं चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय. श्वेता तिवारीची दोन लग्न झाली असून तिचं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत झालेलं. त्यानंतर श्वेतानं अभिनव कोहलीसोबत लग्न केलं. मात्र, त्यांच्याही घटस्फोट झाला.
श्वेता तिवारीबद्दल काय म्हणालेला राजा चौधरी?
काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये श्वेताचा एक्स पती राजा चौधरीनं श्वेतावर आरोप केले होते. लग्न झाल्यानंतर श्वेताचं अभिनेता सीझेनसोबत अफेअर असल्याचं राजा चौधरी म्हणाला. राजा चौधरीनं सांगितलं की, ‘मी श्वेता आणि सीझेनला रंगेहाथ पकडलेलं. श्वेताने मला सांगितलं, ती शुटिंगला जातेय. तिच्या गाडीत माझं सामान होतं, ते मला घ्यायचं होतं, म्हणून मी सेटवर गेलो. पण, ती तिथे नव्हती. एक तासानं श्वेता सीझेनच्या गाडीतून आली आणि त्या गाडीच्या मागून तिचा ड्रायव्हर गाडी घेऊन आला. त्यानंतर दुसऱ्यांदा ती मला म्हणाली, ‘मी डबिंगला आहे’ मी तिथे गेलो. पण तिथे कळलं आज डबिंग नाही. श्वेता सीझेनसोबत होती. असं अनेकदा झालंय, तरीही ती कबूल करत नव्हती, ती कायमच खोटं बोलत आली आहे. श्वेता खूप खोटारडी आहे.’

