Headlines

2014 ते 2026 पर्यंत लाल किल्ल्यावरील पगडीचा प्रवास, पाहा खास फोटो


Independence Day PM Modi Look : भारताचा स्वातंत्र्यदिन आणि लाल किल्ला यांचं नातं देशाच्या राष्ट्रीय उत्सवाशी घट्ट जोडलेलं आहे. या दिवशी पंतप्रधानांचं राष्ट्राला संबोधन, तिरंगा फडकावण्याचा सोहळा आणि लाल किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असतं. मात्र, या सोहळ्यातील आणखी एक गोष्ट गेल्या काही वर्षांपासून आकर्षणाचा विषय ठरली आहे, ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हटके पगडी.

Narendra Modi Independence Day looks
फोटो सौजन्य : pmindia.gov.in, @PMO India, @Narendra Modi x
2014 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी आपल्या पोशाखातूनही भारतीय संस्कृतीची विविधता दाखवण्याचा प्रयत्न केला. दरवर्षी त्यांच्या डोक्यावर दिसणारी पगडी कधी रंगांच्या उधळणीमुळे, तर कधी पारंपरिक बांधणी आणि लेहरिया शैलीमुळे लक्ष वेधून घेते. त्यामुळे लाल किल्ल्यावरील भाषणाइतकाच त्यांच्या ‘Independence Day Look’ चीही चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात होताना दिसते. 2026 च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यातही मोदींच्या पेहरावाने लक्ष वेधून घेतलं. यंदा त्यांच्या डोक्यावर गडद लालसर-मरून रंगाची बांधणी शैलीतील पगडी होती.

त्यावर पांढऱ्या आणि पिवळ्या रंगांच्या ठिपक्यांची नक्षी दिसत होती. पगडीचा लांब कपडा खांद्याच्या दिशेने खाली सोडण्यात आला होता. यासोबत त्यांनी ऑफ-व्हाइट रंगाचा कुर्ता-पायजमा आणि तपकिरी रंगाचं नेहरू जॅकेट परिधान केलं होतं. पारंपरिक भारतीय पोशाखाला आधुनिक साज देणारा हा लूक यंदाच्या सोहळ्याचा आकर्षणबिंदू ठरला. (फोटो सौजन्य : pmindia.gov.in, @PMO India, @Narendra Modi x)

2014 केशरी रंगाच्या पगडीने झाली परंपरेची सुरुवात

2014 केशरी रंगाच्या पगडीने झाली परंपरेची सुरुवात

2014 हे नरेंद्र मोदी यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या लूकच्या दृष्टीने विशेष ठरलं. पंतप्रधान म्हणून पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी केशरी रंगाची आकर्षक बांधणी शैलीतील पगडी परिधान केली होती. या पगडीच्या शेवटच्या भागात हिरव्या रंगाची छटा दिसत होती. त्यावर त्यांनी साधा ऑफ-व्हाइट खादी कुर्ता आणि पांढरी चुरिदार असा पोशाख निवडला होता. साधेपणा आणि पारंपरिक भारतीय शैली यांचा सुरेख मेळ या लूकमध्ये पाहायला मिळाला. याच वर्षापासून स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी मोदींच्या पगडीकडे विशेष लक्ष जाण्याची परंपरा सुरू झाली.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

202015 पिवळ्या रंगाची बहुरंगी पगडी

202015 पिवळ्या रंगाची बहुरंगी पगडी

2015 मध्ये मोदींच्या डोक्यावर पिवळ्या रंगाची पगडी दिसली. त्यावर लाल, हिरवा, निळा अशा विविध रंगांच्या क्रॉस पॅटर्नची नक्षी होती. यामुळे पगडी अधिक उठावदार दिसत होती. त्यांनी त्यासोबत बेज रंगाचा कुर्ता आणि नेहरू जॅकेट परिधान केले होते.(फोटो सौजन्य :-PMO India)

2016 गुलाबी-लाल-पिवळ्या रंगांचा संगम

2016 गुलाबी-लाल-पिवळ्या रंगांचा संगम

2016 मध्ये मोदी यांनी टाय-डाय शैलीतील गुलाबी, लाल आणि पिवळ्या रंगांची पगडी निवडली. पांढऱ्या चौकटीच्या कुर्त्यासोबत ही रंगीबेरंगी पगडी विशेष उठून दिसत होती. पारंपरिक भारतीय वस्त्रकलेचा प्रभाव या लूकमध्ये स्पष्टपणे जाणवत होता. (फोटो सौजन्य :- @Narendra Modi x)

नरेंद्र मोदींचे लाल किल्लावरील भाषण

2017 लाल-पिवळा आणि सोनेरी क्रॉस पॅटर्न

2017 लाल-पिवळा आणि सोनेरी क्रॉस पॅटर्न

2017 च्या स्वातंत्र्यदिनासाठी मोदी यांनी लाल आणि पिवळ्या रंगाची पगडी परिधान केली. त्यावर सोनेरी रंगाच्या क्रॉस-लाइनची नक्षी होती आणि पगडीचा लांब शेवट खालीपर्यंत येत होता. या पगडीमुळे त्यांचा लूक अधिक राजेशाही आणि पारंपरिक वाटत होता. (फोटो सौजन्य :- @Narendra Modi x)

2018 साधी पण उठावदार भगवी-लाल पगडी

2018 साधी पण उठावदार भगवी-लाल पगडी

2018 मध्ये मोदींचा लूक तुलनेने साधा होता. त्यांनी भगवा आणि लाल रंगाची पगडी, लांब शेपटीसह, परिधान केली होती. पांढऱ्या कुर्त्यासोबत काळा-पांढरा स्टोल असा पोशाख होता. या वर्षी पगडीची नक्षी कमी असली तरी तिचे रंग विशेष लक्षवेधी ठरले. (फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2019 लेहरिया शैलीचा रंगीबेरंगी फेटा

2019 लेहरिया शैलीचा रंगीबेरंगी फेटा

2019 मध्ये मोदींनी लाल, केशरी आणि हिरव्या छटांचा लेहरिया फेटा परिधान केला. पांढऱ्या कुर्ता-चुरिदारसोबत हा फेटा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. लेहरिया ही राजस्थानातील प्रसिद्ध पारंपरिक वस्त्रशैली असल्याने मोदींच्या या लूकमध्ये प्रादेशिक संस्कृतीची झलक दिसली. (फोटो सौजन्य :- @Narendra Modi x)

2020 कोरोना काळात पगडीसोबत मास्कचीही चर्चा

2020 कोरोना काळात पगडीसोबत मास्कचीही चर्चा

2020 चा स्वातंत्र्यदिन कोरोना महामारीच्या सावटाखाली पार पडला. मोदींनी केशरी आणि पिवळ्या रंगाची साफी/पगडी परिधान केली होती. मात्र यावेळी त्यांच्या पोशाखातील विशेष गोष्ट म्हणजे केशरी किनार असलेला पांढरा स्कार्फ, ज्याचा वापर त्यांनी तोंड आणि नाक झाकण्यासाठी केला. त्यामुळे त्या वर्षाचा लूक इतर वर्षांपेक्षा वेगळा ठरला.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2021 भगवी पगडी आणि लांब गुलाबी शेपटी

2021 भगवी पगडी आणि लांब गुलाबी शेपटी

75व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने 2021 मध्ये मोदींनी भगव्या रंगाची पगडी, त्यावर लालसर रेषा आणि लांब गुलाबी शेपटीसह परिधान केली. पांढरा पारंपरिक कुर्ता-चुरिदार आणि निळे जॅकेट असा पोशाख होता.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2022 तिरंग्याची झलक असलेली पगडी

2022 तिरंग्याची झलक असलेली पगडी

2022 मध्ये त्यांच्या पगडीमध्ये थेट तिरंग्याचे रंग दिसले. पांढऱ्या पगडीवर भगव्या आणि हिरव्या रंगाच्या पट्ट्या होत्या. त्या वर्षी देशात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू असल्याने या लूकला विशेष महत्त्व मिळाले. पांढरा कुर्ता-चुरिदार आणि निळे जॅकेट असा पोशाख त्यांनी केला होता.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2023 राजस्थानची बहुरंगी बांधणी

2023 राजस्थानची बहुरंगी बांधणी

2023 मध्ये मोदींनी बहुरंगी राजस्थानी Bandhani प्रिंटची पगडी परिधान केली. यात पिवळा, हिरवा, लाल आणि इतर रंगांची आकर्षक नक्षी होती. पगडीचा लांब शेवट वाऱ्यावर फडकताना विशेष लक्ष वेधून घेत होता. ऑफ-व्हाइट कुर्ता-चुरिदार आणि काळे V-neck जॅकेट असा त्यांचा पोशाख होता.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2024 लेहरियाचा रंगीबेरंगी अंदाज

2024 लेहरियाचा रंगीबेरंगी अंदाज

2024 मध्ये मोदींनी पुन्हा राजस्थानी लेहरिया शैलीची पगडी निवडली. केशरी, पिवळा आणि हिरवा अशा रंगछटांनी सजलेली ही पगडी होती. पांढरा कुर्ता-चुरिदार आणि निळे बंदगला जॅकेट असा त्यांचा लूक होता.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2025 भगवा रंग पुन्हा केंद्रस्थानी

2025 भगवा रंग पुन्हा केंद्रस्थानी

2025 मध्ये 79व्या स्वातंत्र्यदिनी मोदींनी भगव्या रंगाची पगडी परिधान केली. पांढऱ्या कुर्ता-चुडीदारासोबत भगवा बंदगला आणि तिरंगी स्टोल असा त्यांचा पोशाख होता. हा त्यांचा लाल किल्ल्यावरचा सलग 12वा स्वातंत्र्यदिनाचा संबोधनाचा प्रसंग होता.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

2026 मरून-बांधणीने पुन्हा पहिल्या लूकची आठवण

2026 मरून-बांधणीने पुन्हा पहिल्या लूकची आठवण

2026 मध्ये मोदींच्या पगडीने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गडद लाल-मरून रंगाच्या Bandhani पगडीवर पांढऱ्या आणि पिवळ्या ठिपक्यांची नक्षी होती. पगडीचा लांब पल्ला खांद्यावरून खाली येत होता. ऑफ-व्हाइट कुर्ता-पायजमा, चॉकलेट-ब्राऊन नेहरू जॅकेट आणि तिरंगी पॉकेट स्क्वेअरने हा लूक पूर्ण केला. काही विश्लेषणांनुसार 2026 च्या या पगडीमध्ये 2014 च्या लाल Bandhej लूकची एक प्रकारे पुनरावृत्ती किंवा त्याला दिलेला आधुनिक संदर्भ दिसतो.(फोटो सौजन्य : pmindia.gov.in)

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा