Headlines

Sushant Singh Rajput Was Disturb After Ex Manager Disha Salian Death ; Sushant Singh Rajput : आता ते मला सोडणार नाहीत! मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर घाबरलेला सुशांत सिंह राजपूत,सख्ख्या बहिणीचा दावा


Sushant Singh Rajput Before Death : सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबाबत त्याची छोटी बहिण श्वेता सिंह किर्तीने एक नवा दावा केला आहे. मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तो खूप घाबरला असल्याचे तिने सांगितले.

sushant singh rajput
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशांत सिंह राजपूतचे निधन होऊन आता सहा वर्षे उलटली आहेत. 14 जून 2020 रोजी तो मुंबईतील वांद्रे येथील त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळला होता. त्याने गळ्याला फास लावून घेतला होता. मात्र, त्याची बहीण श्वेता सिंग कीर्तीचे ठाम मत आहे की तिच्या भावाची आत्महत्या नसून हत्याच झाली होती आणि ती आजही यावर ठाम आहे. श्वेताने सांगितले की, अनेक ‘सायकिक्स’नी तिला सुशांतच्या मृत्यूबाबत काहीतरी संशयास्पद असल्याचे सांगितले होते. या प्रकरणाशी संबंधित अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित असल्याचे तिने नमूद केले. तिने असेही सांगितले की, आपली एक्स व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या निधनानंतर सुशांत अस्वस्थ झाला होता आणि तो म्हणायचा की “ते” त्यालाही सोडणार नाहीत.

‘सुपरटॉक्स बाय द मुव्हिंगशिप’ या युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना श्वेता सिंग कीर्तीने सांगितले की, सुशांतच्या निधनानंतर तिला त्याच्या अस्तित्वाची जाणीव झाली होती. स्वप्ने आणि मेडिटेशनच्या माध्यमातून तिला कधीकधी त्याच्या अस्तित्वाची जाणीव व्हायची, असे तिने सांगितले. तसेच, सुशांतची अस्थी विसर्जनापूर्वी पटणा येथे ठेवलेल्या तेव्हा तिला एका विशिष्ट प्रकारची अनुभूती आली होती, असेही तिने सांगितले.

सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर आपल्या बहिणीला भेटायला आला

श्वेताने सांगितले, “त्या रात्री तो माझ्याशी बोलायला आला होता. त्याने कुर्ता घातला होता. त्याने मला मिठी मारली आणि माझ्याशी तासनतास गप्पा मारल्या. मला त्याला खूप काही विचारायचे होते. मी विचारले, ‘भैया, हे का घडले?’ मी त्याला अनेक गोष्टींबद्दल विचारले आणि त्याने मला सर्व काही समजावून सांगितले. हळूहळू माझ्या मनातील गोंधळ आणि अस्वस्थता दूर होऊ लागली. शेवटी, त्याने मला मिठी मारली आणि माझ्या कपाळाचे चुंबन घेतले. मला त्याचा सुगंध, त्याचा श्वास सर्व काही जाणवत होते.”

Maharashtra TimesJui Gadkari Song video: ठरलं तर मग फेम सायलीनं गायलं ‘जैसे तू है पास मेरे’ गाणं, अभिनयासोबतच ही आवडही जपतेय जुई गडकरी; व्हिडिओ व्हायरल

सुशांतच्या मृत्यूशी संबंधित बाबींवर पुन्हा प्रश्नचिन्ह

श्वेताने सुशांतच्या मृत्यूशी संबंधित अनेक बाबींवर, विशेषतः शवविच्छेदन आणि त्याची खोली आतून बंद असणे या गोष्टींवर प्रश्न उपस्थित केले. श्वेता म्हणाली, “सहा वर्षे उलटून गेली आहेत, तरीही नक्की काय घडले हे आम्हाला अजूनही माहित नाही. शवविच्छेदनाची इतकी घाई का करण्यात आली? तो कधीच आपली खोली आतून बंद करत नसे. मग त्याची खोली त्यावेळी आतून बंद कशी होती? अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही मिळालेली नाहीत. काहीतरी चुकीचे घडले होते. काहीतरी गडबड होती.”

दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत अस्वस्थ होता

श्वेताने असाही दावा केला की, आपली एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सुशांत सिंग राजपूत अत्यंत अस्वस्थ झाला होता. मुंबईतील एका निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला होता. श्वेता सिंग कीर्ती म्हणाली, “दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तो खूप अस्वस्थ झाला होता. तो सतत म्हणायचा की ‘ते’ त्यालाही सोडणार नाहीत. मला माहित नाही. कदाचित त्याच्याकडे अशी काही माहिती असावी जी तो उघड करणार होता. तसे काहीतरी असावे.” जेव्हा विचारले गेले की ‘ते’ सुशांतचा रोख बॉलिवूडमधील लोकांकडे होता का, तेव्हा श्वेताने उत्तर दिले, “त्याबद्दल आम्हाला काहीच माहित नाही.”

Maharashtra TimesAnupama Parameswaran : कधी चांगला वागायचा तर कधी हैवान, बॉयफ्रेंडकडून शारीरिक, मानसिक छळ; लोकप्रिय अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

‘सीबीआय हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत असावे’

श्वेताने असेही स्पष्ट केले की तिला आता सीबीआयकडून कोणत्याही अंतिम निष्कर्षाची गरज नाही, कारण तिला आणि तिच्या कुटुंबाला नेमके काय घडले होते हे आधीच माहित आहे. ती म्हणाली, “आम्हाला आता सीबीआयकडून कोणत्याही निष्कर्षाची अपेक्षा नाही; काय घडले होते हे आम्हाला माहित आहे. कदाचित हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न असू शकतो पण सत्य काय आहे हे आमच्या मनाला ठाऊक आहे. हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न नक्कीच झाला होता.” श्वेताने पुढे सांगितले की, आता तिला तिच्या भावाच्या मृत्यूच्या दुःखात अडकून न राहता, त्याच्या आयुष्याचा आणि त्याने मागे ठेवलेल्या वारशाच्या त्याच्या आठवणी जपत पुढे जायचे आहे.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आणि सीबीआयचा तपास

सुरुवातीला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही आत्महत्या आहे असे म्हटले गेलेले. चाहते, कुटुंबीय आणि विरोधी पक्षांकडून निर्माण झालेला प्रचंड दबाव तसेच हत्येच्या विविध शक्यतांची चर्चा यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले. आपल्या ‘क्लोजर रिपोर्ट’मध्ये, सुशांतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला. या एजन्सीने 6 ऑगस्ट 2020 रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केला होता, परंतु साडेचार वर्षांनंतर अंतिम अहवाल सादर केला. या अहवालात सीबीआयने नमूद केले की, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कोणताही पुरावा त्यांना आढळला नव्हता.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.
आणखी वाचा