Ajinkya Rahne commentry News : भारताचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणे याने निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र तो क्रिकेटपासून पूर्ण दूर राहू शकत नाही हे दिसले. कारण अजिंक्य समालोचक म्हणून आपली नवी इनिंग सुरू करत आहे.

चार वेगवान गोलंदाज
भारत आणि श्रीलंका यांच्यातील क्रिकेट कसोटी मालिकेत फिरकी गोलंदाज वर्चस्व राखतील, असा कयास होता. मात्र, श्रीलंकेने पहिल्या कसोटीसाठी चार वेगवान गोलंदाजांची निवड केली आहे. त्यांच्या साथीला ‘सीम’ मारा करण्याची क्षमता असलेल्या अष्टपैलू मिलान रत्ननायके याची निवड केली आहे. आश्चर्य म्हणजे या संघात तीनच निव्वळ फिरकी गोलंदाज आहेत.
१५ ऑगस्टपासून सुरू होणार कसोटी सामना
पाथुम निसंका आणि कुसल मेंडिस यांच्या अनुपस्थितीत श्रीलंका पहिल्या कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. ही कसोटी गॉल येथे १५ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तेथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना साथ देणारी आहे. मात्र, श्रीलंकेने या संघात असिथा फनाँडो या प्रमुख वेगवान गोलंदाजासह लाहिरू कुमारा, विश्व फनांडो, दिसान मदुशंका या वेगवान गोलंदाजांना निवडले आहे. यापैकी मदुशंका हा डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. तो यापूर्वी एकच कसोटी खेळला आहे. त्याची तीन वर्षांनंतर श्रीलंका संघात निवड झाली आहे. तो दोन महिन्यांपासून टी-२० सामनेच खेळत आहे. या वर्षभरात त्याने एकही प्रथम श्रेणी सामना खेळलेला नाही. तो एकमेव कसोटी २०२३मध्ये खेळला होता. त्यात त्याने एकाही फलंदाजास बाद केले नव्हते.
फक्त ३ फिरकी गोलंदाज
श्रीलंकेने निवडलेल्या १६ जणांच्या संघात तीनच निव्वळ फिरकी गोलंदाज आहेत. गॉल येथे चांगलाच यशस्वी झालेल्या डावखुरा फिरकी गोलंदाज प्रभात जयसूर्या याच्या साथीला एकही कसोटी न खेळलेला ऑफ स्पिनर केशारा नुवांथा यास निवडण्यात आले आहे. नुवांथा आणि रमेश मेडिस यापैकी एकाचीच निवड होईल. सोनल दिनुशा हा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि भरवशाचा फलंदाजही या संघात आहे. नुवांथाने गेल्या महिन्यात भारत ‘अ’ संघाचे
पाच फलंदाज १५९ धावांत टिपले होते. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात ९७ धावांत तीन विकेट मिळवल्या होत्या. तो २५ वर्षांचा असून, त्याच्याकडे १५ प्रथम श्रेणी सामन्यांचा अनुभव आहे. त्यात त्याने ६४ फलंदाज बाद केले आहेत.
निसंका आणि मेंडिस हे भरवशाचे फलंदाज नसल्यामुळे प्रामुख्याने यष्टीरक्षक मानला जात असलेला फलंदाज निरोशा डिकवेला याची निवड केली आहे. तो तीन वर्षांनंतर कसोटी खेळणार आहे. मॅडिस श्रीलंका कसोटी संघाचा पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक आहे. मात्र, तो नसल्यामुळे ३३ वर्षीय डिकवेला संघात पुनरागमन करणार आहे. निसंका नसल्यामुळे एकही कसोटी न खेळलेला आघाडीच्या फळीतील फलंदाज पासिंदू सूरियाबंदरा हाही संघात आहे. अर्थात, निशान मदुश्का आणि लाहिरू उदारा हेच श्रीलंकेच्या डावाची सुरुवात करणार हे जवळपास निश्चित आहे. फलंदाजांची निवड करताना श्रीलंकेच्या निवड समितीने फारसा धोका पत्करलेला नाही. दिनेश चंडिमल, कामिंदू मंडिस, धनजंय डिसिल्वा हे तीन ते पाच क्रमांकावर येऊ शकतात.
… तरीही फिरकीचा धोका
- गॉल येथील स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांच्या एकूण १ हजार १५० विकेट.
- २०१४पासून येथील कसोटीत फिरकी गोलंदाजांच्या १ हजार ३३ विकेट.
- या मैदानावरील २०२१च्या श्रीलंका विंडीज कसोटीत एकूण ३७ पैकी ३६ विकेट फिरकी गोलंदाजांच्या.
- २०२२च्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या फिरकी गोलंदाजांच्या १८ विकेट आगामी आव्हान.
- श्रीलंका संघातील प्रभात जयसूर्याच्या या मैदानावरील ११ कसोटीत ८१ विकेट.
- या मैदानावरील सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत जयसूर्या हा मुथय्या मुरलीधरन (१११) आणि रंगना हेराथ (१०२) यांच्यापाठोपाठ.

