Bay leaf price comparison India USA: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये ४ ग्रॅम तमालपत्राची किंमत १२ डॉलर असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी महिलेनं अमेरिकेत भारतीय मसाले किती महाग विकले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

मराठी महिलेने दाखवली महागाई
हा व्हिडीओ punekar_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जर तुम्ही वाण्याच्या दुकानात तमालपत्र खरेदी केलं, तर साधारण १५ ते २० रुपयांत तुम्हाला ५० ग्रॅम तमालपत्र सहज मिळेल. आणि जर एखाद्या मोठ्या ब्रँडचं पॅकेजिंग असलेलं तमालपत्र ऑनलाइन मागवलं, तर त्यामध्ये कदाचित आणखी १०-१५ रुपयांचा फरक पडेल. पण आपल्याकडे १५ रुपयांत मिळणाऱ्या या मसाल्यासाठी अमेरिकेत १२०० रुपये खर्च करावे लागत आहेत. गंमत म्हणजे, या महिलेने या किमतीच्या अनुषंगाने किलोचा हिशोब केला. अन् त्यानंतर जो आकडा समोर आला, तो पाहून तुम्हाला चक्करच येईल.
(फोटो सौजन्य – Victoria Bowers/pexels.com)
किलोसाठी किती रुपये खर्च होतील?
४ ग्रॅम तमालपत्र जर तुम्हाला १२ डॉलरमध्ये मिळत असेल, तर १ किलोसाठी साधारण ३ हजार डॉलर खर्च करावे लागतील. अन् जर या रकमेचं भारतीय मूल्य काढलं, तर जवळपास २ लाख ८० हजार रुपये खर्च करावे लागतील. अहो, एवढ्या पैशात भारतामध्ये पुढच्या १० वर्षांचे मसाले आपण खरेदी करू. असो, पण यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

