Headlines

4 Grams of Bay Leaves Cost 12 Dollar in America Viral Video Leaves Indians Shocked | ४०० रुपयांचा मसाला अमेरिकेत मिळतो २ लाखांना, मराठी महिलेनं दाखवलं वास्तव, साध्या साध्या वस्तूंच्या किंमती पाहून व्हाल वेडे


Bay leaf price comparison India USA: अमेरिकेतील सुपरमार्केटमध्ये ४ ग्रॅम तमालपत्राची किंमत १२ डॉलर असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी महिलेनं अमेरिकेत भारतीय मसाले किती महाग विकले जातात हे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.

Bay leaf price in USA
(फोटो सौजन्य – punekar_in_america/instagram)
भारतीय मसाले जगभरात प्रसिद्ध आहेत. कारण या मसाल्यांचा वापर केल्यामुळे पदार्थ चविष्ट बनतात. पण गंमत म्हणजे, जे मसाले आपण आपल्या देशात किरकोळ किमतीत खरेदी करतो, त्यासाठी अमेरिकेत तुम्हाला कर्ज काढायला लागू शकतं. होय, भारतीय मसाले अमेरिकेत हजारोंच्या किमतीत विकले जातात. होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. एक भारतीय महिला अमेरिकेतल्या सुपरमार्केटमध्ये तमालपत्र खरेदी करतेय. पण जेव्हा तिनं किंमत पाहिली तेव्हा तिचेही डोळे विस्फारले. कारण ४ ग्रॅम तमालपत्राची किंमत तब्बल १२ डॉलर्स होती. म्हणजे भारतीय रुपयांत रूपांतर केलं तर जवळपास तुम्हाला १२०० रुपये खर्च करावे लागतील.

मराठी महिलेने दाखवली महागाई

मराठी महिलेने दाखवली महागाई

हा व्हिडीओ punekar_in_america या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. जर तुम्ही वाण्याच्या दुकानात तमालपत्र खरेदी केलं, तर साधारण १५ ते २० रुपयांत तुम्हाला ५० ग्रॅम तमालपत्र सहज मिळेल. आणि जर एखाद्या मोठ्या ब्रँडचं पॅकेजिंग असलेलं तमालपत्र ऑनलाइन मागवलं, तर त्यामध्ये कदाचित आणखी १०-१५ रुपयांचा फरक पडेल. पण आपल्याकडे १५ रुपयांत मिळणाऱ्या या मसाल्यासाठी अमेरिकेत १२०० रुपये खर्च करावे लागत आहेत. गंमत म्हणजे, या महिलेने या किमतीच्या अनुषंगाने किलोचा हिशोब केला. अन् त्यानंतर जो आकडा समोर आला, तो पाहून तुम्हाला चक्करच येईल.
(फोटो सौजन्य – Victoria Bowers/pexels.com)

किलोसाठी किती रुपये खर्च होतील?

​ ​

४ ग्रॅम तमालपत्र जर तुम्हाला १२ डॉलरमध्ये मिळत असेल, तर १ किलोसाठी साधारण ३ हजार डॉलर खर्च करावे लागतील. अन् जर या रकमेचं भारतीय मूल्य काढलं, तर जवळपास २ लाख ८० हजार रुपये खर्च करावे लागतील. अहो, एवढ्या पैशात भारतामध्ये पुढच्या १० वर्षांचे मसाले आपण खरेदी करू. असो, पण यावर तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा