Headlines

Man Caught Secretly Recording Girl in Delhi Metro Deleted Video but Got Exposed | ‘महाराष्ट्रात भेटला असता तर चोपला असता’, गुपचूप मुलीचे व्हिडीओ काढले, अन् जाब विचारताच केले डिलिट, मेट्रोमधील व्हिडीओ व्हायरल


Women safety in Delhi Metro: दिल्ली मेट्रोमध्ये तरुणीचा गुपचूप व्हिडीओ काढणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडलं. त्याने व्हिडीओ डिलीट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीने रिसायकल बिनमधून पुरावा शोधला.

Delhi Metro viral video
(फोटो सौजन्य – praveenyaaaa/Instagram)
महिला सुरक्षा हा देशभरातील खूप मोठा प्रश्न आहे. पोलीस प्रशासन हे महिलांच्या मदतीसाठी २४ तास काम करतं. पण तरी देखील काही लोकं पोलिसांची भीती न बाळगता सर्रास चुकीची कामं करतात. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मेट्रोमध्ये प्रवास करत असताना त्यानं गुपचूप समोर बसलेल्या तरुणीचा व्हिडीओ काढला. अन् जेव्हा तिनं या प्रकरणी त्याच्याकडे जाब विचारला, तेव्हा तो आरोप फेटाळू लागला. किंबहुना, निरागस चेहरा करून आपण निर्दोष असल्याचा आव आणू लागला. पण लक्षवेधी बाब म्हणजे, तरुणीनं हुशारी दाखवत व्हिडीओ डिलीट करताना त्याला पकडलं. पण तरी देखील आपण काहीच केलेलं नाही, तुम्ही खोटे आरोप करताय, असं प्रतिउत्तर तो देऊ लागला.

व्हिडीओ डिलीट करताना पकडलं

व्हिडीओ डिलीट करताना पकडलं

हा व्हिडीओ praveenyaaaa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिल्ली मेट्रोमधून प्रवास करताना एका तरुणीनं गुपचूप व्हिडीओ काढणाऱ्या एका व्यक्तीला रंगेहात पकडलं. लक्षवेधी बाब म्हणजे, तरुणीनं जाब विचारताच तिच्या डोळ्यांसमोर त्यानं व्हिडीओ डिलीट केला आणि आपण काहीच केलेलं नाही, असा आव आणू लागला. पण तरुणी हुशार होती. तिनं त्याचा मोबाईल घेतला आणि रिसायकल बिनमध्ये जाऊन तो व्हिडीओ त्याला दाखवला. पण तरीदेखील त्यानं आपली चूक मान्य केली नाही. उलट, लगेचच रिसायकल बिनमधून व्हिडीओ डिलीट केला आणि काहीच केलं नाही, असं म्हणू लागला.

नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

​ ​

पण त्याची ही संपूर्ण कृती तरुणीनं व्हिडीओमध्ये कैद केली. आणि त्याच्याविरोधात पोलीस तक्रार करणार, असा इशारा तिला दिला. हा व्हिडीओ आतापर्यंत ९१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेलाय. शिवाय, नेटकऱ्यांनीदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत त्या व्यक्तीविरोधात संताप व्यक्त केलाय. तसंच, काही लोकांनी देशात महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल देखील केलाय. असो, अशा व्यक्तींवर कुठली कारवाई केली पाहिजे? तुमचं काय मत आहे?

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा