Strict orders from eknath shinde against milk adulterators in meeting with fda tukaram mundhe; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत बैठक, एकनाथ शिंदेंचे भेसळेखोरांबद्दल कडक आदेश
Strict orders from eknath shinde against milk adulterators in meeting with fda tukaram mundhe; तुकाराम मुंढेंच्या उपस्थितीत बैठक, एकनाथ शिंदेंचे भेसळेखोरांबद्दल कडक आदेश
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळखोरांवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिल्या. सह्याद्री अतिथीगृह येथे ‘विकसित महाराष्ट्र २०४७’अंतर्गत सन २०२६-२७साठी विभागनिहाय निश्चित केलेले टप्पे आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या बैठकीत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सादरीकरणादरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सूचना केल्या.
‘अन्नभेसळ हा साधा गुन्हा नसून तो थेट नागरिकांच्या, बालकांच्या जीवाशी खेळ आहे. बनावट पनीर, भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे कर्करोगासारख्या दुर्धर आजारांना सामोरे जावे लागू शकते. भेसळखोर समाजकंटकांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावर जरब बसवावी,’ असे एकनाथ शिंदे म्हणाले.
भेसळखोरांवर कारवाई करताना त्यांच्यावर अजामीनपात्र गुन्हे दाखल करावेत, जेणेकरून त्यांना कायदेशीर पळवाटा मिळणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. अशा प्रकरणांतील कायदेशीर प्रक्रिया अधिक बळकट करण्यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कोणतीही कायदेशीर त्रुटी राहू नये, यासाठी ज्येष्ठ विधिज्ञांची मदत घ्यावी, यासाठी तातडीने विशेष कायदेशीर पथक तयार करावे, असे निर्देशही शिंदे यांनी दिले.
बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, विधी व न्याय राज्यमंत्री आशीष जयस्वाल, गृह, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम, एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.
खतांच्या ‘लिंकिंग’ची येथे करा तक्रार
इतर युरिया, डीएपी किंवा खतांसोबत अनावश्यक कृषी साहित्याचे सक्तीने ‘लिकिंग’ करून त्यांची खरेदी करण्यास शेतकऱ्यांना भाग पाडणे हे बेकायदा आहे. असा प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० किंवा ९८२२४४६६५५ वर तक्रार करावी. लिंकिंगमध्ये वितरक, विक्रेते किंवा उत्पादकांची हातमिळवणी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी दिले आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा