China Typhoon Dolphin: ‘डॉल्फिन’चा तडाखा, चीन-जपान हादरले, गाड्या पाण्यात तरंगल्या, विमानसेवा रद्द – typhoon dolphin hits china 150 kmph winds over 1 million evacuated
China Typhoon Dolphin: ‘डॉल्फिन’चा तडाखा, चीन-जपान हादरले, गाड्या पाण्यात तरंगल्या, विमानसेवा रद्द – typhoon dolphin hits china 150 kmph winds over 1 million evacuated
चीनच्या पूर्व किनारपट्टीवर वर्षातील सर्वात शक्तिशाली असं उष्णकटिबंधीय ‘डॉल्फिन’ चक्रीवादळ धडकलं आहे. या वादळाचा वेग लँडफॉलच्या वेळी तब्बल ताशी १५० किलोमीटरपेक्षा अधिक होता. लँडफॉल म्हणजे काय तर, जेव्हा समुद्रावरून वाहणारे चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडून जेव्हा भूभागाला धडकतं त्याला लँडफॉल म्हणतात. अशा वेळी या वादळामुळं वाऱ्याचा वेग प्रचंड जास्त असतो आणि किनारपट्टीवर सर्वाधिक विनाशकारी प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. असं हे चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेले सर्वाधिक शक्तिशाली वादळ किंवा टायफून होतं. या वादळाचा सर्वाधिक फटका झेजियांग, शांघायसह पूर्व चीनमधील भागांना बसला असून मुसळधार पाऊस, पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झालाय. खबरदारी म्हणून सध्या या भागातील 10 लाखांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. शांघायमध्ये वाहतूक आणि विमानसेवेवर मोठा परिणाम झाला असून शेकडो विमानांचे उड्डाण रद्द करावं लागलंय. तर बंदरातील शेकडो जहाजांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. दरम्यान दुसरीकडे याच ‘डॉल्फिन’ चक्रीवादळामुळं भारतातील पाऊस रोखल्याची चर्चा आहे. तेव्हा हे चक्रीवादळ आहे काय, याचं वैशिष्ट्य काय सांगतंय आणि चीनच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या टायफूनचा किती मोठ्या प्रमाणात चीनला फटला बसला आहे, तिथला आत्ताची परिस्थिती काय आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत.#China #TyphoonDolphin #Typhoon #ChinaStorm #ChinaFlood #WeatherAlert #StormAlert #Shanghai #Zhejiang #Hubei #Beijing #WeatherNews #ChinaNews #NaturalDisaster #BreakingNews #ClimateChange #WeatherAlert #ClimateAlert #WeatherUpdates #WeatherNewsChina’s east coast has been hit by Typhoon Dolphin, described as the strongest tropical cyclone of the year, with winds exceeding 150 km/h at landfall. Zhejiang, Shanghai and nearby regions have faced heavy rain, flooding and landslide risks. More than one million people have been evacuated, while hundreds of flights and port operations have been disrupted. There is also speculation that Typhoon Dolphin could be affecting India’s rainfall. So, what makes this storm so powerful, and how severe is the situation in China?