Headlines

‘तुझ्या आई-बापाने हेच शिकवलंय का?’; संगकारा इरफान पठाणवर का भडकला? 21 वर्षांनी वादाचं कारण समोर


Irfan Pathan on Kumag Sangakkara : भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण आणि कुमार संगकारा यांच्यात २००५ मध्ये दिल्ली कसोटीमध्ये वाद झाला होता. या वादाची सुरूवात संगकाराने केली होती. पण नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या

Kumar Sangakkara Irphan Pathan
Kumar Sangakkara Irphan Pathan(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : क्रिकेटच्या मैदान म्हटलं की वाद-विवाद आलेच. भारतीय क्रिकेट संघ आता श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांसाठी गेला आहे. पहिला कसोटी सामना १५ ऑगस्टला पार पडणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण याने स्टार स्पोर्ट्सच्या ‘चीकी सिंगल्स’ शो मध्ये श्रीलंकेच्या कुमार संगकारासोबत झालेल्या वादाबाबत त्याने खुलासा केलाय. २००५ मध्ये दोघांमध्ये हा वाद झाला होता, त्यानंतर तब्बल २१ वर्षांनी दोघांमध्ये नेमकं झालं होतंं? तो वाद कशावरून झाला होता, सर्व प्रकरण जाणून घ्या.

श्रीलंका संघभारत दौऱ्यावरआलेला, सात वनडे सामने आणि तीन कसोटी सामन्यांचे आयोजन होते. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये सुरू होता. इरफान पठाण ओपनिंगला आला होता, त्याने ९३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात चेंडूचा बॉक्स बदलल्याने श्रीलंकेचे खेळाडू नाराज होते. संगकारा सर्वात जास्त रागावलेला होता. यादरम्यान मी बॅटिंगला गेलो मला माहित नव्हतं की काय घडलं आहे ते, मी असा खेळाडू होतो की माझं फक्त खेळावरच लक्ष असायचं, बाकी गोष्टीत नाही पडायचो. ओपनिंगला गेलेलो, मुरलीधरनला नव्या चेंडूवर एक समोर आणि आणि मिडविकेटला दुसरा षटकार लगावला. मुरलीधरनसारख्या गोलंदाजाला दोन चेंडूंवर दोन षटकार म्हणजे त्यांच्या संघाचा आत्मविश्वास गळून पडत होता. त्यावेळी संगकारा मला बोलू लागला की, तु्म्ही चिडत आहात. आई-बापाने हेच शिकवले आहे का? मी विचार करू लागलो की हा असं का बोलत आहे. मी सोबतच्या फलंदाजाला विचारल्यावर त्याने मला सर्व सांगितलं. त्यावेळी मीपण संगकाराला तशाच प्रकारे उत्तर दिलं होतं.

Maharashtra TimesIND vs SL 1st Test : डोमेस्टिकच्या हिटमॅनची भारतीय संघात निवड, साई सुदर्शनच्या जागी संधी, कष्टाचं फळ मिळालंच, पाहा कोण?
२००८ मध्ये आयपीएल लिलावानंतर समजले की आम्ही दोघे एकाच संघाकडून खेळणार आहोत. (पंजाब संघाने दोघांना खरेदी केलेले) मी ज्यांच्याविषयी बोललो तो कुटुंबासोबत जेवण करत होता. मलाच लाज वाटली आणि समोरून जाऊन पहिली माफी मागितली. संगकाराही सॉरी बोलला, त्यावेळी त्यानेही मान्य केलं की सुरूवात त्याने केली होती. त्यानंतर आमची खूप चांगली मैत्री झाली, परिस्थिती कशीसुद्धा असो पण तुम्ही समजूतदारपणे गोष्टी कशा प्रकारे हाताळता हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक खेळाडू काही ना काही चूक करतोच, पण त्या भावना असतात संघाला विजय मिळवून देण्यासाठीच्या जाणूनबुजून कोणी करत नाही, असं इरफान पठाण याने सांगितलं.

Maharashtra TimesZaheer Khan : भारतीय संघात पुन्हा कमबॅक करायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेव’; झहीर खानचा मोहम्मद शमीला कानमंत्र, काय म्हणाला?दरम्यान, इरफान पठाण आणि कुमार संगकारा या दोघांची आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना एकत्र अशी भागीदारी झाली नाही. कारण संगकारा टॉप ऑर्डरला आणि इरफान हा लोअर ऑर्डरला यायचा. त्यामुळे मोठी आणि लक्षात राहणारी अशी कोणताही भागीदारी झाली नाही. मात्र दोघे मैदानात स्ट्रॅटेजी करताना अनेकवेळा एकत्र आल्याचं सर्व चाहत्यांनी पाहिलं आहे.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे हरिश मालुसरे, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये एक्झिक्युटिव्ह कंटेंट प्रॉड्युसर म्हणून कार्यरत आहेत. ते २०२४ पासून मटा ऑनलाइनसोबत जोडले गेले आहेत. गेली सात वर्षे ते विविध मीडिया समूहांमध्ये काम करत आहेत. त्यांना स्पोर्ट्स, क्राइम आणि राजकीय बातम्यांमध्ये विशेष रुची आहे.

पत्रकारितेमधील अनुभव
पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेत असताना झी २४ तास आणि सकाळ या माध्यम समूहांमध्ये इंटर्नशीप केली होती. त्यानंतर मास मीडियाच्या शेवटच्या वर्षाला असताना ‘थोडक्यात’ या वेब पोर्टलमध्ये इंटर्न म्हणून काम केले आहे. त्यानंतर थोडक्यात मध्येच नोकरीची संधी मिळाली, तिथेच काही दिवसांनी शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबादारी सांभाळली. यादरम्यान लोकसभा आणि विधानसभा २०१९ निवडणुकांचे टेक्स्ट बातम्यांमधून वार्तांकन केले. मराठी चित्रपटसृष्टीतील ‘श्रीराम समर्थ’ या चित्रपटातील संत रामदासांची भूमिका साकारणारे मराठी अभिनेते शंतून मोघे यांची छोटेखानी मुलाखत घेतली. (लिंक : https://youtu.be/-wsyyekJ-DE?si=SaJ_OC9nUgLFmKXK)

‘थोडक्यात’ नंतर सकाळ डीजिटलमध्ये सोशल मीडिया एक्सेक्युटिव्ह म्हणून काम पाहिले आहे, त्यावेळी टी-२० वर्ल्ड कपचे लाईव्ह करत क्रीडाप्रेमींना माहिती दिली. त्यानंतर ‘पोलीसनामा’मध्ये काम करत असताना सीडीआर वाचून समजून घेत अनेक स्टोरी साध्या आणि सोप्या शब्दात बातमी लेखन केले. यादरम्यान कॉलेज पूर्ण झाल्यावर झी २४ तासमध्ये संधी मिळाली, मुंबईत झी २४ तासमध्ये महाराष्ट्र केसरी कु्स्ती स्पर्धेवर विशेष स्टोरी केल्या आहेत. टीव्ही९ मराठीमध्ये Sub-Editor, Social Media Executive म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर २०२४ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये जॉइन झाले.

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये महाराष्ट्र, क्राइम आणि स्पोर्ट्स या तिन्ही सेक्शनमध्ये ट्रेंडनुसार बातमी लेखन करतात. आता पार पडलेल्या विधानसभा निवडणूक आणि निकालांचे कव्हरेज बातम्यांच्या माध्यमातून केले. महापालिका निवडणुकांमध्ये मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर या महत्त्वाच्या जिल्ह्यांचे स्थानिक पातळीवर भागानुसार सविस्तर वार्तांकन केले आहे. महापालिका निवडणुकीमध्ये सायली वांजळे यांची मुलाखत घेतली होती. लिंक: https://youtu.be/Wejw-eMnXqI?si=jyeD36tRboIc9bpJ. त्यासोबतच आता टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे कव्हरेज पाहत आहेत.

शैक्षणिक पात्रता
हरीश मालुसरे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून झाले आहे. तिथूनच 2022 साली एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण पूर्ण केले. त्यांचे मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असून डिजिटल पत्रकारितेतील सातहून अधिक वर्षांचा अनुभव आहे.आणखी वाचा