Headlines

Passenger Lights Oil Lamp in 3AC Coach Despite Warnings Viral Video Sparks Outrage | ट्रेनमध्ये आग लागली तर जबाबदार कोण? AC कोचमध्ये पेटवला दिवा, झारखंडमधील व्हिडीओ व्हायरल


Indian Railways Safety Rules: ट्रेनमध्ये आग पेटवणे किंवा ज्वलनशील वस्तूंचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. पण हे माहित असताना सुद्धा एका व्यक्तीनं AC कोचमध्ये दिवा पेटवला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

Train 3AC Diya Viral Video
(फोटो सौजन्य – @JharkhandRail/x.com)
ट्रेनमधून प्रवास करताना ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगणं कायद्यानं गुन्हा मानला जातो. कारण अशा पदार्थांमुळे इतर प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, हे माहित असूनही काही लोकांमध्ये मूलभूत नागरी जबाबदारीची जाणीव नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे ते सर्रास ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगतात आणि काही जण तर त्याचं उघडपणे प्रदर्शनही करतात. अशाच एका प्रवाशाचा व्हिडिओ सध्या समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही एका व्यक्तीला धावत्या 3AC डब्यात दिवा पेटवताना पाहू शकता. हा प्रकार पाहून नेटकरी संतापले असून, डब्याला आग लागली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नेमकं घडलं काय?

हा व्हिडिओ @JharkhandRail या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये AC कोचच्या वरच्या बर्थवर एक व्यक्ती दिवा पेटवताना दिसत आहे. दरम्यान, इतर प्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती कोणाचंच ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. दिवा आणि अगरबत्तीमधून निघणाऱ्या धुरामुळे फायर अलार्म वाजू शकतो, अशी विनंतीही आसपासच्या प्रवाशांनी केली. काही जणांनी आग लागण्याची भीतीही व्यक्त केली. मात्र, त्या व्यक्तीने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आपली पूजा सुरूच ठेवली.

नेटकरी करत आहेत कारवाईची मागणी

हा व्हिडिओ २ लाख ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे, “ट्रेनमध्ये दिवा लावणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.” तर काही जण या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा