Indian Railways Safety Rules: ट्रेनमध्ये आग पेटवणे किंवा ज्वलनशील वस्तूंचा वापर करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे इतर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी धोका निर्माण होऊ शकतो. पण हे माहित असताना सुद्धा एका व्यक्तीनं AC कोचमध्ये दिवा पेटवला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत.

नेमकं घडलं काय?
हा व्हिडिओ @JharkhandRail या X अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये AC कोचच्या वरच्या बर्थवर एक व्यक्ती दिवा पेटवताना दिसत आहे. दरम्यान, इतर प्रवाशांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो व्यक्ती कोणाचंच ऐकण्याच्या मानसिकतेत दिसत नाही. दिवा आणि अगरबत्तीमधून निघणाऱ्या धुरामुळे फायर अलार्म वाजू शकतो, अशी विनंतीही आसपासच्या प्रवाशांनी केली. काही जणांनी आग लागण्याची भीतीही व्यक्त केली. मात्र, त्या व्यक्तीने सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि आपली पूजा सुरूच ठेवली.
नेटकरी करत आहेत कारवाईची मागणी
हा व्हिडिओ २ लाख ४५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच, अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी म्हणत आहे, “ट्रेनमध्ये दिवा लावणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं.” तर काही जण या व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

