Bombay High Court slams FDA Tukaram Mundhe over licence suspend of Amazon Bhiwandi Godown Crime News; तलवारीने डास मारल्यासारखं करु नका, हायकोर्टाच्या FDA ला कानपिचक्या; आधी प्रशंसा केलेय, पण कायदेशीर प्रक्रियेचं काय?
Bombay High Court slams FDA Tukaram Mundhe over licence suspend of Amazon Bhiwandi Godown Crime News; तलवारीने डास मारल्यासारखं करु नका, हायकोर्टाच्या FDA ला कानपिचक्या; आधी प्रशंसा केलेय, पण कायदेशीर प्रक्रियेचं काय?
Bombay High Court slams FDA : अन्न व औषध प्रशासनाकडून चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटलेले आहे. मात्र कोणतीही कारवाई कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला फटकारले.
तुकाराम मुंढे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : ‘अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) चांगले व प्रशंसनीय काम सुरू असल्याचे आम्ही यापूर्वीही म्हटलेले आहे. परंतु, काही प्रकरणांत कारवाई करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन होत नसल्याचे वारंवार समोर येत आहे. अपिल कालावधीदरम्यान कारवाई करता येत नाही, हा कायद्याचा प्रस्थापित सिद्धांत असूनही या प्रकरणात परवाना रद्द करण्याचा आदेश कसा काढला? हे म्हणजे तलवारीने डास मारल्यासारखे आहे. असे करू नका. जी काही कारवाई करायची आहे ती कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे करा’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने एफडीएला शुक्रवारी पुन्हा एकदा कानपिचक्या दिल्या.
भिवंडी गोदामाचा परवाना रद्द
अन्न सुरक्षा नियमांनुसार मुदत संपलेल्या वस्तूंची विल्हेवाट लावली नसल्याच्या कारणावरून अॅमेझॉन रिटेल इंडियाच्या भिवंडीमधील गोदाम बंद करून गोदामाचा परवाना एफडीएच्या अधिकाऱ्यांनी रद्द केला. त्याला आव्हान देणारी याचिका या कंपनीने केली आहे. याविषयी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली.
Crime News : ग्लुकोज ड्रिपमधून पतीला विष, प्रियकराच्या सेल्फी व्हिडिओने महिला गोत्यात, मृत्यूच्या तीन महिन्यांनी बॉडी बाहेर काढण्याची वेळ‘अधिकाऱ्यांनी २४ जून रोजी गोदामाची पाहणी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कोणतीही सुधारणा नोटीस न देता गोदामाचा परवाना निलंबित केला. त्यानंतर आम्ही कारणे दाखवा नोटीसला उत्तर दिले आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे अपिलही केले. ते प्रलंबित असतानाच परवाना रद्दचा आदेशही काढण्यात आला. गोदामातील मुदत संपत असलेल्या अन्य पदार्थांची विल्हेवाट लावण्यासही आम्हाला परवानगी दिली नाही’, असे कंपनीने ज्येष्ठ वकील व्यंकटेश धोंड यांच्यामार्फत खंडपीठाच्या निदर्शनास आणले.
याविषयी खंडपीठाने एफडीएकडे विचारणा केली असता, अनियमितता आढळल्यास काही ना काही कारवाई करणे आवश्यक आहे, असे म्हणत प्रतिज्ञापत्रावर उत्तर देण्यासाठी मुदत देण्याची विनंती सरकारी वकिलांनी केली. त्यावर, ‘तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. परंतु, कायदेशीर प्रक्रियेचे काय? एफडीएच्या मोहिमेची आम्ही यापूर्वीच प्रशंसा केलेली आहे. परंतु, अपिल कालावधीत कारवाई करायची नसल्याचा प्रस्थापित कायदेशीर सिद्धांत असताना परवाना रद्द कसा केला? अशाप्रकारे कारवाई करून मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आदी शहरांतील सर्व व्यवसायिक आस्थापने बंद करणार का? हे म्हणजे तलवारीने डास मारल्यासारखे आहे’, अशा शब्दांत खंडपीठाने उपरोधिक टोला लगावला. अखेरीस एफडीएला उत्तर देण्यासाठी मुदत देऊ पुढील सुनावणी सोमवार, १० ऑगस्ट रोजी ठेवली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा