- Marathi News
- Opinion
- Pandit Vijayshankar Mehta: Unknown Power & Gen Z Spirituality | Estonia Visit
3 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक

तरुणांच्या बाबतीत केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतितही आहे आणि आश्वस्तही. ‘जेन-झी’ने अनेक देशांत आपली उपस्थिती नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी मी एस्टोनियाच्या दौऱ्यावर होतो. तिथेमी सुंदरकांडावर प्रवचन दिले होते. त्यानंतर टालिन या राजधानीतील महिला गाइडने मी काय सांगितले हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली.
जेव्हा मी त्यांना सुंदरकांडात सांगितलेल्या यशाचे महत्त्व समजावून सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्या देशातील तरुणांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, आमच्या देशातही तरुण उद्धट झाले आहेत, पण 60 टक्के तरुणांचा धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढला आहे. आधी ते धार्मिक स्थळांना भेट देत नसत, पण आता परदेशातही लोक तिथे जातात आणि याकडे ‘मानसिक आरोग्य’ म्हणून पाहतात. त्यांचे बोलणे ऐकून मला भारतातील मंदिरांत ‘जेन-झी’ पिढीचा जयघोष ऐकू येऊ लागला. कारण, मी जेव्हा देशातील तरुणांना भेटतो, तेव्हा ते म्हणतात -“आम्हाला ईश्वराबद्दल फारसे माहिती नाही, पण आता असे जाणवू लागले आहे की, कोणती तरी अज्ञात शक्ती किंवा परम ऊर्जा आहे, जीआपली मदत करते.
