Headlines

Pandit Vijayshankar Mehta: Unknown Power & Gen Z Spirituality


  • Marathi News
  • Opinion
  • Pandit Vijayshankar Mehta: Unknown Power & Gen Z Spirituality | Estonia Visit

3 दिवसांपूर्वी

  • कॉपी लिंक

तरुणांच्या बाबतीत केवळ भारतच नाही, तर संपूर्ण जग चिंतितही आहे ‎आणि आश्वस्तही. ‘जेन-झी’ने अनेक देशांत आपली उपस्थिती‎ नोंदवली आहे. काही दिवसांपूर्वी मी एस्टोनियाच्या दौऱ्यावर होतो. तिथे‎मी सुंदरकांडावर प्रवचन दिले होते. त्यानंतर टालिन या राजधानीतील ‎महिला गाइडने मी काय सांगितले हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त‎ केली.

जेव्हा मी त्यांना सुंदरकांडात सांगितलेल्या यशाचे महत्त्व‎ समजावून सांगितले, तेव्हा त्यांनी त्यांच्या देशातील तरुणांवर भाष्य केले. ‎त्या म्हणाल्या, आमच्या देशातही तरुण उद्धट झाले आहेत, पण 60 टक्के‎ तरुणांचा धर्म आणि अध्यात्माकडे कल वाढला आहे. आधी ते धार्मिक‎ स्थळांना भेट देत नसत, पण आता परदेशातही लोक तिथे जातात आणि ‎याकडे ‘मानसिक आरोग्य’ म्हणून पाहतात. त्यांचे बोलणे ऐकून मला ‎भारतातील मंदिरांत ‘जेन-झी’ पिढीचा जयघोष ऐकू येऊ लागला.‎ कारण, मी जेव्हा देशातील तरुणांना भेटतो, तेव्हा ते म्हणतात -‎“आम्हाला ईश्वराबद्दल फारसे माहिती नाही, पण आता असे जाणवू ‎लागले आहे की, कोणती तरी अज्ञात शक्ती किंवा परम ऊर्जा आहे, जी‎आपली मदत करते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत