Headlines

Shakib Al Hasan Home Petrol bomb attack after joining Sheikh Hasina press conference; बांगलादेशचा माजी कर्णधार शाकिब हसनच्या घरावर हल्ला, शेख हसीनांची प्रेस कॉन्फरन्स जॉईन केल्याने रोष


Shakib Al Hasan Home Petrol bomb attack : बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन याने व्हर्च्युअल सहभाग घेतल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली.

Shakib Al Hasan Sheikh Hasina Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
ढाका : बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाकिब अल हसन (३९) याच्या घरावर पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. बांगलादेशमधील मागुरा जिल्ह्यात असलेल्या शाकिबच्या निवासस्थानी बुधवारी रात्री स्थानिक वेळेनुसार पावणेनऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेत शाकिबने व्हर्च्युअल सहभाग घेतल्यानंतर काही तासांतच ही घटना घडली. शाकिब सध्या देशाबाहेर आहे.

समाजकंटकांनी घरावर पेट्रोल बॉम्ब फेकले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या घराची तोडफोड केली आणि त्याला आग लावण्याचा प्रयत्न केला; तर स्थानिक वृत्तांनुसार, या हल्ल्यादरम्यान पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले. हल्ल्यादरम्यान फटाके फुटल्यासारखे स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याचे स्थानिकांनी सांगितले. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार त्याच्या घराच्या दिशेने पेट्रोल बॉम्बही फेकण्यात आले होते. मात्र पेट्रोल बॉम्बचा वापर झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनी अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

शेख हसिना यांच्या ‘अवामी लीग’ पक्षाने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये शाकिबच्या घराबाहेर फटाके फुटल्यासारखे आवाज ऐकू येतात. शाकिब हा मगुरा-१ मतदारसंघातून अवामी लीगचा माजी खासदार आहे.

Maharashtra TimesSatish Naikodi : वय वर्ष 50, काय उरलं आयुष्यात, परत कसं उभं राहायचं? क्राईम पेट्रोल फेम मराठी अभिनेत्याची फसवणूक, व्हिडिओत उद्विग्न सवालपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या घराच्या दिशेने विटा आणि दगड भिरकावले, त्यामुळे खिडक्यांच्या काचा फुटल्या; त्यानंतर त्यांनी घराला आग लावण्याचाही प्रयत्न केला. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

“काही समाजकंटकांनी घराच्या दिशेने विटांचे तुकडे भिरकावले आणि खिडक्यांची तोडफोड केली. तसेच, घराला आग लावण्याचाही प्रयत्न केला,” अशी माहिती मगुरा सदर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अब्दुल्ला अल मामून यांनी ‘द डेली स्टार’ला दिली.

शेख हसीना यांच्या पीसीनंतर घटना

बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेख हसीना यांनी जुलै-ऑगस्ट २०२४ मधील अशांततेच्या परिस्थिती हाताळण्याबाबत आपल्या सरकारची बाजू मांडली. तसेच ज्या विद्यार्थी नेतृत्वाखालील उठावामुळे त्यांना सत्तेवरुन पायउतार व्हावे लागले, तो उठाव म्हणजे एखादे उत्स्फूर्त आंदोलन नसून अत्यंत सुनियोजित पद्धतीने घडवून आणलेली सत्तांतर मोहीम होती, असा दावा त्यांनी केला.

शाकिबचे राजकीय कनेक्शन

बांगलादेशच्या अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून ओळखला जाणारा शकिब हा अवामी लीगशी असलेल्या राजकीय संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. २०२४ च्या निवडणुकीत अवामी लीगच्या तिकिटावर मगुरा-१ मतदारसंघातून तो खासदार म्हणून निवडून आला; मात्र विरोधी पक्षांनी या निवडणुकीवर टीका केली होती. ऑगस्ट २०२४ मधील राजकीय उलथापालथीनंतर बांगलादेशात अवामी लीगला निवडणुका लढवण्यापासून रोखण्यात आले.

Maharashtra TimesFaridabad Teacher Murder : माजी विद्यार्थ्याची घाणेरडी मागणी, सरस्वती स्कूलच्या शिक्षिकेचा नकार, टीचरच्या खुनामागील रहस्याचा उलगडा; दोन मुलांच्या डोळ्यांना आईचा शोधशेख हसिनांचे सरकार कोसळल्यापासून शाकिब बांगलादेशला परतलेला नाही. आपली वैयक्तिक सुरक्षा आणि त्रासापासून संरक्षण होईल याची खात्री मिळाल्यास आपण परत येऊन कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्याने वारंवार सांगितले आहे.