Headlines

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक

.

अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात

पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर धरले. सरकार हजारो पोलीस लावून शेतकऱ्यांच्या जमिनी बळजबरीने हिरावून घेत आहे. शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय त्यांच्या जमिनी घेण्यास आमचा तीव्र विरोध असून, आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आज देशातील ऊर्जा, खाद्यतेल, विमानतळ, बंदरे, सिमेंट, डेटा सेंटर आणि रिअल इस्टेट अशा सर्वच क्षेत्रांत अदानींची मक्तेदारी आहे. महाराष्ट्रातील तब्बल ७ ते ८ लाख कोटींच्या जमिनी कवडीमोल भावाने त्यांच्या घशात घातल्या गेल्या आहेत.

जर प्रकल्प राबवायचाच असेल तर वनविभाग किंवा महसूल विभागाच्या पडीक जमिनींवर राबवावा. पण मोदीजी आणि अदानींची मैत्री टिकवण्यासाठीच हा सर्व घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यावर साडेदहा लाख कोटींचे कर्ज; आश्रमशाळांतील मुलांचे हाल

राज्याच्या विदारक आर्थिक स्थितीकडे लक्ष वेधत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (PWD) ५८ हजार कोटी आणि आदिवासी विभागाचे १३ हजार कोटी रुपये कंत्राटदारांना देणे बाकी आहे. कोरोना काळापासून राज्यातील 980 आश्रमशाळांचे सुमारे 600 कोटी रुपये थकीत असल्याने मुलांना वेळेवर अन्नधान्य आणि जेवण मिळत नाहीये. ही राज्यासाठी अत्यंत लाजीरवाणी परिस्थिती आहे.

राज्यावर साडेदहा लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले असून सरकारची पत आता गळ्यापर्यंत आली आहे. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी हे सरकार नेहरू, इंदिरा गांधी आणि आता गरज पडल्यास महात्मा गांधींवरही खापर फोडेल, असा टोला त्यांनी लगावला.

दबावाखाली येऊन नियमबाह्य जात प्रमाणपत्रे देऊ नयेत

जात प्रमाणपत्र आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला कायद्याची आठवण करून दिली. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजासाठी लढत आहेत, यावर आमचा आक्षेप नाही. पण दबावाखाली येऊन नियमबाह्य पद्धतीने कुणालाही जात प्रमाणपत्रे वाटू नयेत. चुकीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवल्यास आणि नंतर ते रद्द झाल्यास सरकारचा वेळ आणि पैसा वाया जातो. नागपूर जिल्हा परिषदेसारखी परिस्थिती पुन्हा मराठवाड्यात ओढवू नये, यासाठी सरकारने संविधानाच्या आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच प्रमाणपत्रे द्यावीत.

मोहन भागवतांकडून तरुणांना खोट्या देशभक्तीचे डोस

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या मुंबईतील ‘जेन-झी’ (Gen-Z) तरुणांसोबतच्या संवादावरही त्यांनी सडकून टीका केली. आजचा तरुण सरकारच्या धोरणांविरोधात उभा राहिला आहे. त्यांना पुन्हा संघाकडे वळवण्यासाठी आणि सत्तेत येण्यासाठीच हा खटाटोप सुरू आहे. विद्यापीठांमध्ये संघाचीच माणसे बसलेली असल्याने, प्रत्येक विद्यापीठातून २०० ते ३०० मुलांना जबरदस्तीने या कार्यक्रमाला बसवले जाईल आणि त्यांना खोट्या देशभक्तीचे डोस पाजले जातील. पण यामुळे तरुणांचे पोट भरणार नसून, केवळ सत्ताधाऱ्यांचेच पोट भरणार आहे.

‘गुंगी गुडिया’ ही शिवी नाही; अजितदादांच्या अपघातावर गप्प का?

सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात वापरण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या शब्दाचे त्यांनी समर्थन केले. “अजितदादांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होतो, तेव्हा या सत्तेसाठी हपापलेल्या नेत्यांच्या तोंडातून ब्र निघत नाही, साधा एफआयआर दाखल होत नाही. पण ‘गुंगी गुडिया’ बोलल्यावर मात्र हे आक्रमक होतात. यांना थोडीतरी लाज वाटली पाहिजे,” अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

‘गुंगी गुडिया’ ही कोणतीही शिवी नसून, राम मनोहर लोहिया यांनी इंदिरा गांधींसाठीही हा शब्द वापरला होता. सुनेत्रा पवार यांनी या शब्दाचा राग मानण्यापेक्षा अजितदादांच्या अपघाताची चौकशी जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत पदावर राहणार नाही अशी ठाम भूमिका घ्यायला हवी होती, असा सल्ला वडेट्टीवारांनी दिला.

हेही वाचा…

गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल वाहून गेला: विरोधकांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित पवारांचे सरकारवर टीका

गडचिरोली जिल्ह्यातील कोठी-कोरणार मार्गावरील पुलाचा काही भाग अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या पाण्यामुळे खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत