![]()
Abhijeet Dipke CJP Meeting : सीजेपी आंदोलनाची दिशा आज ठरणार; अभिजित दीपके यांच्या घरी कोअर कमिटीची बैठक
नवी दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनानंतर कॉक्रोच जनता पार्टीची (सीजेपी) पुढील रणनीती ठरविण्यासाठी वाळूज महानगर येथे संस्थापक, अध्यक्ष अभिजित दीपकेयांच्या घरी बुधवारी कोअर कमिटीची बैठक झाली. आज, गुरुवारीही बैठक होणार असून, सर्व मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर दुपारी दोन वाजता पक्षाची पुढील दिशा प्रसारमाध्यमांसमोर जाहीर केली जाणार असल्याची माहिती दीपके यांनी दिली.
