शहाबाज शरीफ आणि नक्वी यांच्यात तीव्र मतभेद
► वृत्तसंस्था
इस्लामाबाद
पाकिस्तानात पुन्हा राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे लष्कर आणि तेथील लोकनियुक्त सरकार यांच्यात तीव्र स्वरुपाचे मतभेद निर्माण झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी आणि पाकिस्ताचे नेते शहाबाज शरीफ यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. नक्वी हे पाकिस्तानचे लष्करशहा असीम मुनिर यांचे उजवे हात मानले जातात. त्यांचे शरीफ यांच्याशी पटेनासे झाल्याने स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे.
पाकिस्तानची प्रशासन व्यवस्था कोलमडली आहे, असे विधान काही दिवसांपूर्वीच मोहसीन नक्वी यांनी केले आहे. त्यामुळे केवळ पाकिस्तानात नव्हे, तर जगात खळबळ उडाली आहे. हे विधान नक्वी यांनी केले असले, तरी त्यांचे बोलविते धनी असीम मुनिर आहेत, अशी टीका होता आहे. त्यामुळे हा संघर्ष नक्वी आणि शरीफ यांच्यापुरता मर्यादित नसून तो प्रशासन आणि लष्कर यांच्यात निर्माण झाला आहे, असे स्पष्टपणे जाणवत आहे. विदेशी पत्रकारांनीही ही स्थिती मांडली आहे.
प्रत्येकाविरोधात कारवाई करणार
राज्यव्यवस्था कोलमडली आहे, एवढेच बोलून नक्वी थांबलेले नाहीत. या स्थितीला प्रशासनातील ज्या व्यक्ती जबाबदार असतील, त्यांच्या विरोधात त्यांच्या स्थानाचा विचार न करता कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यांचा रोख थेट शहाबाज शरीफ यांच्याकडे आहे, असे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक प्रशासकीय अधिकारी घाबरुन गेल्याचे वृत्त आहे. शहाबाझ शरीफ यांच्या विरोधात बंड केले जाईल, अशी शक्यताही आहे. असीम मुनिर पाकिस्तानचे लोकनियुक्त प्रशासन गुंडाळून ठेवून स्वत:कडे सर्व सत्ता घेण्याचीशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पाकिस्तानातील सध्याची नाममात्र लोकशाही
