Headlines

Pimpri Chinchwad Morwadi Vinod Pillai Family Death Case Online Ordered Sodium Nitrate and Letter Found in House; आधी ‘सोडियम नायट्रेट’ मागवलं, नंतर ऑनलाईन माहिती घेतली, पिल्लाई कुटुंबाने स्वत:ची अखेर केली, घरात चिठ्ठी सापडली


Pimpri Morwadi Pillai Family Death Case : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेत विनोद पिल्ले त्यांची पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचा मृत्यू झाला आहे.

Pimpri Morwadi Pillai Family Death Case
पिंपरी उच्चशिक्षित पिल्लाई कुटुंब मृत्यू(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : औद्योगिक नगरी असणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील मोरवाडीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पती उच्चशिक्षित पत्नी सुद्धा एका शाळेत समन्वय आणि मुलगी कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिकत होती. काही वर्षांपर्यंत सगळं काही सुखात सुरू होतं, मात्र कालांतराने आर्थिक स्थिती बिघडली आणि पिल्लाई कुटुंबाने आपला जीवन प्रवास संपवण्याचा निर्णय घेतला.

घरात कोळसा पेटवून…

घरात कोळसा पेटवून त्यात सोडियम नायट्रेट हे विषारी रसायन टाकून घरात धूर करत या कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष असणारे विनोद पिल्लाई हे ‘आयआयएम’ अहमदाबादचे माजी विद्यार्थी होते. त्यांची पत्नी एका खासगी शाळेत समन्वयक होती तर मुलगीसुद्धा कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.
Maharashtra TimesPune News : अंत्यसंस्कारावेळीच ग्रामस्थांची धावाधाव, बॉडी खाली ठेवत सगळेच पळाले; पुण्यातील आंबेगावमध्ये असं काय घडलं?
पिल्लाई कुटुंबाचं पुण्यात स्वतःचे एक घर सुद्धा होतं. मात्र, कालांतराने त्यांची आर्थिक स्थिती कोलमडल्यानं त्यांना ते घर विकावं लागलं. त्यानंतर ते पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. गावी पिलाई कुटुंबाच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली होती. त्यामुळे प्रचंड आर्थिक गर्तेत अडकलेल्या या कुटुंबाला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय प्रचंड धक्कादायक होता. आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडलेल्या या कुटुंबात सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ही घटना समोर आली. मात्र, या कुटुंबाने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय दोन महिने आधीच घेतला असल्याचं तपासात समोर आलं आहे.

पैसे देण्यासाठी कुणाचा दबाव?

विनोद पिल्लाई यांनी तब्बल दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच 1 जून रोजी, ऑनलाईन माध्यमातून ‘सोडियम नायट्रेट’ या प्रतिबंधित आणि अत्यंत घातक रसायनाची ऑर्डर दिली होती. याबद्दल त्यांनी सुरुवातीला ऑनलाईन माध्यमातून संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी अखेर घरात कोळसा पेटवत त्यावर सोडियम नायट्रेट टाकत घरात धूर केला आणि यामध्ये विनोद पिल्लाई यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Maharashtra TimesPune Crime : टोकाचा निर्णय रागाच्या भरात नाही, पिंपरीतील कुटुंबाचे दोन महिनेआधी प्लॅनिंग, 1 जूनशी मृत्यूचं कनेक्शन
प्रचंड आर्थिक संकटात अडकलेल्या या कुटुंबाने जीवन संपवण्याचा प्लॅन दोन महिनेआधीच केला होता, असं तपासात धक्कादायकरित्या समोर आलं आहे. यातील आणखी माहिती मिळवण्यासाठी संत नगर पोलिसांकडून या तिघांचेही मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले असून त्यामधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यात पिल्लाई कुटुंबावर आर्थिक देणे देण्यासाठी कोणाचा दबाव होता का? कोण्या सावकाराकडून यासाठी त्यांचा मानसिक छळ करण्यात येत होता का? या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे.
Maharashtra TimesAbhijeet Dipke : वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?’ RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा

‘यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये’

सोसायटीतील नागरिकांनी पाहणी केली असता घरातील भयानक प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात दाखल केलं, परंतु विनोद यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये ‘आम्ही आर्थिक अडचणींमुळे स्वतःहून हे पाऊल उचलत असून, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा स्पष्ट उल्लेख आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा