Pimpri Morwadi Pillai Family Death Case : पिंपरी-चिंचवडमधील मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीत आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेत विनोद पिल्ले त्यांची पत्नी सिरजा पिल्ले आणि मुलगी पौर्णिमा पिल्ले यांचा मृत्यू झाला आहे.

घरात कोळसा पेटवून…
घरात कोळसा पेटवून त्यात सोडियम नायट्रेट हे विषारी रसायन टाकून घरात धूर करत या कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवली आहे. कुटुंबातील कर्ता पुरुष असणारे विनोद पिल्लाई हे ‘आयआयएम’ अहमदाबादचे माजी विद्यार्थी होते. त्यांची पत्नी एका खासगी शाळेत समन्वयक होती तर मुलगीसुद्धा कम्प्युटर सायन्सच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती.
Pune News : अंत्यसंस्कारावेळीच ग्रामस्थांची धावाधाव, बॉडी खाली ठेवत सगळेच पळाले; पुण्यातील आंबेगावमध्ये असं काय घडलं?
पिल्लाई कुटुंबाचं पुण्यात स्वतःचे एक घर सुद्धा होतं. मात्र, कालांतराने त्यांची आर्थिक स्थिती कोलमडल्यानं त्यांना ते घर विकावं लागलं. त्यानंतर ते पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी परिसरात एका भाड्याच्या घरात राहत होते. गावी पिलाई कुटुंबाच्या घराचं बांधकाम सुरू असल्यानं आर्थिक स्थिती आणखीनच बिकट झाली होती. त्यामुळे प्रचंड आर्थिक गर्तेत अडकलेल्या या कुटुंबाला या सगळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय प्रचंड धक्कादायक होता. आर्थिक विवंचनेच्या गर्तेत सापडलेल्या या कुटुंबात सामूहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ही घटना समोर आली. मात्र, या कुटुंबाने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय दोन महिने आधीच घेतला असल्याचं तपासात समोर आलं आहे.
पैसे देण्यासाठी कुणाचा दबाव?
विनोद पिल्लाई यांनी तब्बल दोन महिन्यांपूर्वीच, म्हणजेच 1 जून रोजी, ऑनलाईन माध्यमातून ‘सोडियम नायट्रेट’ या प्रतिबंधित आणि अत्यंत घातक रसायनाची ऑर्डर दिली होती. याबद्दल त्यांनी सुरुवातीला ऑनलाईन माध्यमातून संपूर्ण माहिती घेतली होती. त्यानंतर शुक्रवारी अखेर घरात कोळसा पेटवत त्यावर सोडियम नायट्रेट टाकत घरात धूर केला आणि यामध्ये विनोद पिल्लाई यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
Pune Crime : टोकाचा निर्णय रागाच्या भरात नाही, पिंपरीतील कुटुंबाचे दोन महिनेआधी प्लॅनिंग, 1 जूनशी मृत्यूचं कनेक्शन
प्रचंड आर्थिक संकटात अडकलेल्या या कुटुंबाने जीवन संपवण्याचा प्लॅन दोन महिनेआधीच केला होता, असं तपासात धक्कादायकरित्या समोर आलं आहे. यातील आणखी माहिती मिळवण्यासाठी संत नगर पोलिसांकडून या तिघांचेही मोबाईल फॉरेन्सिक लॅबला पाठवले असून त्यामधून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. यात पिल्लाई कुटुंबावर आर्थिक देणे देण्यासाठी कोणाचा दबाव होता का? कोण्या सावकाराकडून यासाठी त्यांचा मानसिक छळ करण्यात येत होता का? या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे.
Abhijeet Dipke : वडिलांना 60 हजार पगार, अमेरिकेत मुलाच्या शिक्षणासाठी खर्च कसा केला?’ RTI कार्यकर्त्याच्या प्रश्नावर अभिजीत दिपकेंचा मोठा खुलासा
‘यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये’
सोसायटीतील नागरिकांनी पाहणी केली असता घरातील भयानक प्रकार उघडकीस आला. स्थानिकांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने सर्वांना रुग्णालयात दाखल केलं, परंतु विनोद यांचा आधीच मृत्यू झाला होता. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट जप्त केली आहे, ज्यामध्ये ‘आम्ही आर्थिक अडचणींमुळे स्वतःहून हे पाऊल उचलत असून, यासाठी कोणालाही जबाबदार धरू नये,’ असा स्पष्ट उल्लेख आहे.

