Headlines

Meena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा


Meena Kumari Painful Story : बॉलिवूड अभिनेत्री मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्य खूप खडतर होतं. त्यांनी १५ वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न केलेलं.

Meena Kumari Alcohol Addiction And Painful Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. काही अभिनेत्री आज आपल्यात नसल्या तरी या अभिनेत्री आजही चाहत्यांच्या स्मरणात आहेत. या अभिनेत्रींपैकीच एक अभिनेत्री म्हणजे मीना कुमारी . मीना कुमारी यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्रोफेशनल आयुष्यासोबतच त्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिल्या.

मीना कुमारी यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आणि प्रचंड प्रसिद्धी मिळवली, तरीही त्यांचं आयुष्य अनेक संकटांनी भरलेलं होतं. त्यांना वैयक्तिक आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागला. नंतर त्यांना दारूचं व्यसन लागलं आणि कमी वयातच अभिनेत्रीचं निधन झालं.
Maharashtra TimesNaseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी

जन्मानंतर वडिलांनी अनाथाश्रमात सोडलं

मीना कुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३३ रोजी मुंबईत झाला. त्या एका मुस्लिम कुटुंबातील होत्या, त्यांचं खरं नाव मेहजबीन बानो होतं. मीना यांच्या वडिलांना मुलगा हवा होता आणि जेव्हा त्यांचा जन्म झाला, तेव्हा अभिनेत्रीच्या वडिलांनी रागाच्या भरात अभिनेत्रीला अनाथाश्रमात सोडून दिलं. मीना यांच्या आईला खूप त्रास झाला. यानंतर, मीना यांच्याच्या वडिलांनी त्यांना अनाथाश्रमातून परत आणलं. मीना कुमारी यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती, त्यामुळे त्यांनी लहान वयातच चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. मीना यांनी १९३९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लेदरफेस’ या चित्रपटात काम केलं.

Celebrity Corner : प्रशांत दामलेंसह ‘शिकायला गेलो एक’ नाटकाच्या कलाकारांसोबत गप्पा

मुख्य अभिनेत्री म्हणून मीना कुमारी यांना पहिली ओळख ‘बैजू बावरा’ या चित्रपटातून मिळाली. मीना यांनी या चित्रपटात दिवंगत अभिनेते भरत भूषण यांच्यासोबत काम केलेलं. चित्रपटासाठी मीना यांना १९५४ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
Maharashtra TimesSanjay Dutt : ‘आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं’, नर्गिस यांची कॅन्सरशी झुंज, संजय दत्तनं सांगितला कठीण काळ

मीना कुमारी यांचं वैयक्तिक आयुष्य

मीना यांनी लहान वयातच प्रसिद्ध दिग्दर्शक कमल अमरोही यांच्याशी लग्न केलं. कमल आधीच विवाहित होते आणि त्यांना मुलं होती, ते अभिनेत्रीपेक्षा १५ वर्षांनी मोठे होते. मीना आणि कमल यांचं नातन चढ-उतारांनी भरलेलं होतं. लग्नाच्या १२ वर्षांनंतर त्यांचं नातं तुटलं आणि कमल यांनी मीना यांना घटस्फोट दिला. कालांतराने मीना कुमारी यांना दारूचं व्यसन लागलं आणि त्यामुळे अभिनेत्रीला लिव्हरचा आजार झाला. या आजाराशी झुंज देत, ३१ मार्च १९७२ रोजी, वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी मीना यांचं निधन झालं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा