Headlines

जपली मैत्री, मानधनाला कात्री! सलमान खानचा मोठा निर्णय ५० कोटींवर सोडणार पाणी


Salman Khan Reduce fee for svc 63 fees:सलमान खान म्हटलं की चर्चा होते ती तिच्या कोट्यवधींच्या संपत्तीची आणि त्याच्या मानधनाची. एखाद्या सिनेमासाठी १०० कोटींच्या घरात फी घेणाऱ्या सलमानं आता मित्रासाठी एक मोठा निर्णय घेतलाय.

Salman Khan SVC 63 fees
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: बॉलिवूडचा ‘दबंग’ अभिनेता सलमान खान सिनेमांसोबत वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याच्या मैत्रीचे अनेक किस्से चर्चेत येतात. आता त्याच्या मैत्रीचा असाच एक किस्सा समोर आलाय. सलमान सध्या त्याच्या आगामी भव्य प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे, बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्यांपैकी एक मानला जाणारा सलमान एका चित्रपटासाठी सहसा १२० कोटी रुपयांपेक्षा जास्त मानधन घेतो. मात्र, त्याच्या आगामी ‘SVC 63’ या बहुप्रतिक्षित चित्रपटासाठी सलमाननं आपली फी तब्बल ५० कोटी रुपयांनी कमी केल्याचं म्हटलं जात आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामागे त्याचं एका खास मित्रासोबत असलेले नातं हे मुख्य कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

Maharashtra TimesMahesh Tilekar: मुलगा आजारी, घरी जायला पैसे नाहीत; कॉमेडी नटाने खोटं बोलून पैसे लाटले, महेश टिळेकरांना आला धक्कादायक अनुभव
१२० कोटींवरून थेट ७० कोटींवर
काही रिपोर्ट्सनुसार, ‘SVC 63‘ या चित्रपटासाठी सलमान खाननं तब्बल ५० कोटी रुपयांच्या मानधनावर पाणी सोडलं आहे.आता तो या चित्रपटासाठी १२० कोटींऐवजी ७० कोटी रुपये मानधन घेणार आहे. सलमान खानच्या या निर्णयाने चित्रपटसृष्टीत आणि त्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

५० कोटी कमी करण्याचं नेमकं कारण काय?
या मानधन कपातीमागे सलमान खानचा जवळचा मित्र रफी काझी असल्याचं बोललं जात आहे.रफी काझी आणि सलमान खान यांच्यात अतिशय घट्ट मैत्री आहे. रफी काझी यांनीच सलमान खानला ‘SVC 63’ या प्रोजेक्टशी आणि या चित्रपटाच्या निर्मात्यांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.आपल्या मित्राचा आदर राखण्यासाठी आणि त्याच्यासोबतची मैत्री अधिक दृढ ठेवण्यासाठी सलमान खाननं कोणताही विचार न करता आपल्या मानधनात एवढी मोठी कपात केली आहे.

‘SVC 63’ चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक वामशी पेडीपल्ली हे सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. तर निर्मिती दिल राजू, श्री व्यंकटेश्वर क्रिएशन्सची आहे.दाक्षिणात्य स्टार नयनताराही सिनेमात दिसणार आहे. सलमान आणि नयनतारा पहिल्यांदा एकत्र झळकणार असल्यानं सिनेमाबद्दल उत्सुकता आहे.

Maharashtra TimesRamanand Sagar Ramayan: ‘रामायण’ मधील कलाकारांच्या दागिन्यांसाठी वापरली जायची भारी आयडिया, तर VFX साठी होता भन्नाट जुगाड
सलमान खान आणि वामशी पेडीपल्ली यांची ही जोडी पहिल्यांदाच एकत्र येत असल्यानं या चित्रपटाबद्दलही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट पुढील काळात बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

भाग्यश्री रसाळ

लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला  हा  त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे.  या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल  कंटेंट प्रोड्युसर या  वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय  म्हणजेच कंटेंट तयार करण्यात  हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता  पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे.  या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान  यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.

विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव.  काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.

आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.आणखी वाचा