Headlines

Friendship Day 2026 Wishes in Marathi


friendship day 2026 quotes in marathi : मैत्री हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि खास नात्यांपैकी एक आहे. रक्ताच्या नात्यांपेक्षा वेगळे असले तरी मैत्रीचे नाते मनाने जोडलेले असते. सुखाच्या क्षणी आनंद साजरा करणारे आणि दुःखाच्या काळात खंबीरपणे साथ देणारे मित्र-मैत्रिणी आयुष्याला खास बनवतात. अशाच या सुंदर नात्याचा उत्सव म्हणजे फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे 2026 निमित्ताने आपल्या खास मित्रमैत्रिणींना प्रेम, आपुलकी आणि आठवणींनी भरलेल्या मराठी शुभेच्छा पाठवून त्यांना आनंदी करा. WhatsApp Status, Instagram Caption, Facebook पोस्ट किंवा HD Friendship Day Image सोबत सुंदर मराठी संदेश शेअर करण्यासाठी येथे काही खास शुभेच्छा दिल्या आहेत.

Friendship Day Quotes In Marathi
Friendship Day Quotes In Marathi
मैत्री हे असे नाते आहे, ज्यामध्ये कोणतेही बंधन नसते, कोणत्याही अपेक्षा नसतात आणि तरीही या नात्यात प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा भरपूर असतो. आयुष्याच्या प्रवासात अनेक व्यक्ती भेटतात, काही काळ सोबत राहतात आणि नंतर दूर जातात; पण काही खास मित्र असे असतात जे कायम आपल्या मनात घर करून राहतात. त्यांच्या सोबतच्या छोट्या-छोट्या आठवणीही आयुष्यभर चेहऱ्यावर हसू आणतात.शाळेतील पहिल्या बाकावर बसलेला मित्र असो, कॉलेजच्या दिवसांमध्ये साथ देणारी मैत्रीण असो किंवा आयुष्याच्या कठीण प्रसंगात मदतीचा हात पुढे करणारा जिवलग मित्र असो, प्रत्येकाची जागा आपल्या आयुष्यात वेगळी आणि खास असते. मैत्रीचे नाते काळानुसार बदलत नाही, उलट वेळ आणि परिस्थिती जसजशी बदलते तसतशी त्याची किंमत आणखी वाढत जाते.

आजच्या डिजिटल युगात मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. WhatsApp, Instagram, Facebook यांसारख्या माध्यमांमुळे आपण आपल्या खास व्यक्तींना दूर असूनही जवळ ठेवू शकतो. फ्रेंडशिप डेच्या दिवशी छोटासा संदेश आपल्या मित्राच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. (फोटो सौजन्य :- @iStock)

मित्रांसाठी प्रेमळ शुभेच्छा

मित्रांसाठी प्रेमळ शुभेच्छा

जग बदललं तरी चालेल,
पण माझ्या मित्रांची साथ
कधीच बदलू नये.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा!

मैत्री दिनाच्या खास शुभेच्छा

मैत्री दिनाच्या खास शुभेच्छा

माझ्या जिवलग मित्रा,
तुझ्यासारखा मित्र मिळणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.
तुझी साथ, तुझा विश्वास आणि तुझी मैत्री अशीच आयुष्यभर राहो.
मैत्री दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

मैत्रीच्या सुंदर नात्याला सलाम

मैत्रीच्या सुंदर नात्याला सलाम

नात्यांमध्ये सर्वात सुंदर नातं म्हणजे मैत्री,
कारण इथे अपेक्षा कमी आणि प्रेम जास्त असतं.
माझ्या प्रिय मित्राला/मैत्रिणीला
मैत्री दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

खास मित्रांसाठी मनापासून शुभेच्छा

खास मित्रांसाठी मनापासून शुभेच्छा

आयुष्यात अनेक लोक भेटतात,
पण काही माणसं मनात कायमची जागा बनवतात.
त्यापैकी एक तू आहेस.
आपली मैत्री अशीच कायम राहो.
Happy Friendship Day 2026!

फ्रेंडशिप डे 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

फ्रेंडशिप डे 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री म्हणजे फक्त सोबत चालणं नाही,
तर प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथ देणं होय.
माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा मित्र/मैत्रीण आहे,
हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

फ्रेंडशिप डे 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

फ्रेंडशिप डे 2026 च्या हार्दिक शुभेच्छा

मैत्री म्हणजे फक्त सोबत चालणं नाही,तर प्रत्येक परिस्थितीत एकमेकांची साथ देणं होय.माझ्या आयुष्यात तुझ्यासारखा मित्र/मैत्रीण आहे,हीच माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे.मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा