Headlines

Sachin Deshpande : ‘फॉलोअर्समुळे मुख्य भूमिका मिळते, ते तुमचं अभिनयकौशल्य ठरवत नाहीत’, रील्स स्टार्सबद्दल सचिन देशपांडेचं वक्तव्य


Sachin Deshpande Exclusive : मालिका आणि सिनेमांमध्ये सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सचिन देशपांडेनं भाष्य केलं आहे.

Sachin Deshapande On Reel Stars And Social Media Influencers
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – आजकाल सोशल मीडियावरील फॉलोअर्स बघून मालिका आणि सिनेमांमध्ये रील्स स्टार्सना कास्ट केलं जातं. त्यावर अनेक कलाकारांनी खंत व्यक्त केली आहे. अशातच आता मराठी अभिनेता सचिन देशपांडेनंही ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर भाष्य केलं असून संताप व्यक्त केला आहे.

सचिन देशपांडे म्हणाला की, ‘मी काही प्रोजेक्ट्स केले. पण, मधला काळ असा होता, जेव्हा माझ्याकडे काम नव्हतं. मी खूप ऑडिशन दिल्या. अनेकांना मेसेज केले. पण, नंतर लक्षात आलं, त्यांच्याही हातात काही नाहीये. फॉलोअर्स बघून काम देणं, हा ट्रेंड फार दिवस नाही राहणार. इन्स्टाग्राम सोडून दुसरं काहीतरी येईल. पण, ज्यांना त्यातलं गणित नाही जमत, त्यांनी काय करायचं? लाईक्स, कमेंट्सचं खूप प्रेशर असतं. वेळेत पोस्ट नाही केलं, तर फॉलोअर्स कमी होतात.’
Maharashtra TimesMeena Kumari : 15 वर्षांनी मोठ्या दिग्दर्शकासोबत लग्न, दारूचं व्यसन, वयाच्या 39 व्या वर्षी मृत्यू; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची हृदयद्रावक कथा
‘ज्याला लीड रोल मिळालाय, त्याचे आपणहून फॉलोअर्स वाढतात. त्यामुळे त्याला दुसरा प्रोजेक्ट मिळतो. फॉलोअर्स असल्यामुळे त्यालाच मुख्य भूमिका मिळते. नाहीतर मग नवीन मुलाला किंवा मुलीला मुख्य भूमिका मिळते. मधल्या फळीतले कलाकार वरच्या लेव्हलला जाऊन पोहोचलेत, असे खूप कमी आहेत. त्यांच्याकडे भाऊ, मित्र, पाहुणा कलाकार म्हणून बघितलं जातं. दोन महिन्यात एका वाहिनीनं तिच जोडी पुन्हा रिपीट केली आहे.’

सचिन देशपांडेचं वक्तव्य

‘काहीतरी आक्षेपार्ह कंटेंट टाकला की, फॉलोअर्स वाटतात. त्यानंतर जाहिराती मिळतात, मग मुख्य भूमिकांसाठी विचारणा होते. हे फेम जास्त दिवस नाही राहत. तुमचे फॉलोअर्स तुमचं अभिनयकौशल्य ठरवत नाहीत. तुमचं अभिनयकौशल्य आणि तुमचा अनुभवच तुमच्या अभिनयाला योग्य न्याय मिळवून देऊ शकतो. आधी केलेलं काम आणि ऑडिशन याआधारेच सगळं ठरवावं, असं मला वाटतं.’ असं सचिननं शेवटी सांगितलं.
Maharashtra TimesKangana Ranaut : ‘तरुणांची दिशाभूल करू नका, त्यासाठी मला लाखो रुपये मिळालेले’ जुन्या सिनेमातील व्हायरल व्हिडिओवर कंगना रणौतचा संताप
दरम्यान, सचिन देशपांडेच्या कामाबद्दल बोलायचं तर त्यानं ‘होणार सून मी ह्या घरची’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘काहे दिया परदेस’, ज्ञानेश्वर माऊली’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.