Headlines

Antilia Case Update: Sachin Vaze, Pradeep Sharma Face UAPA Charges


देशातील उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने

.

आरोपींनी दाखल केलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर प्रक्रियांमुळे गेली पाच वर्षे आरोप निश्चितीची प्रक्रिया रखडली होती. मात्र, आता विशेष न्यायालयाने कठोर पावले उचलत या सर्व आरोपींविरुद्ध बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायदा (UAPA) आणि भारतीय दंड संहितेतील हत्या, गुन्हेगारी कट रचणे यांसारख्या अत्यंत गंभीर कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. या निर्णयामुळे आता साक्षीदारांची साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होऊन खटल्याची सुनावणी वेगाने पुढे सरकणार आहे.

२५ फेब्रुवारी २०२१: ‘अँटिलिया’बाहेर जिलेटिनच्या कांड्यांनी खळबळ

दक्षिण मुंबईतील मुकेश अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ या निवासस्थानाजवळ २५ फेब्रुवारी २०२१ रोजी एक बेवारस संशयित स्कॉर्पिओ गाडी उभी असल्याचे आढळले होते. या गाडीची तपासणी केली असता त्यात जिलेटिनच्या २० कांड्या आणि थेट धमकी देणारे एक पत्र सापडले होते. या घटनेमुळे संपूर्ण देशात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती.

५ मार्च २०२१: मनसुख हिरेन यांचा खाडीत आढळला मृतदेह

या धक्कादायक घटनेच्या अवघ्या १० दिवसांत, म्हणजेच ५ मार्च २०२१ रोजी संबंधित स्कॉर्पिओ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील खाडीत अत्यंत संशयास्पद स्थितीत आढळून आला. मनसुख हिरेन यांची हत्या पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि त्यांच्या साथीदारांनीच घडवून आणल्याचा थेट आणि गंभीर आरोप हिरेन यांच्या कुटुंबीयांनी केला होता.

एटीएसकडून एनआयएकडे तपास अन् अटकेची मालिका

या प्रकरणाचा प्राथमिक तपास महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडे होता. मात्र, प्रकरणाची व्याप्ती आणि गांभीर्य विचारात घेऊन केंद्रीय गृह मंत्रालयाने हा तपास तात्काळ राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग केला. ‘एनआयए’ने तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचत घटनेचा मुख्य सूत्रधार आणि कट रचल्याप्रकरणी सचिन वाझे, कटात सहभाग आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, विनायक शिंदे, नरेश गोर, रियाझुद्दीन काझी यांच्यासह एकूण १० जणांना बेड्या ठोकण्यात आल्या.

पाच वर्षांनंतर न्यायालयीन प्रक्रियेला वेग

या प्रकरणात आरोपींकडून दाखल करण्यात आलेले डिस्चार्ज अर्ज आणि विविध कायदेशीर याचिकांमुळे आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित होती. अखेर विशेष न्यायालयाने सर्व अर्जांवरील सुनावणी पूर्ण करून आरोप निश्चित केले आहेत. आता साक्षीदारांची साक्ष, पुराव्यांची नोंद आणि अन्य न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याने या हायप्रोफाइल प्रकरणाच्या सुनावणीला गती मिळण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा…

सिद्धिविनायक मंदिरातून 18 कोटींच्या दानचोरीचा आरोप:राज ठाकरेंचा घणाघात, तर विश्वस्तांचेही प्रत्युत्तर; काय आहे प्रकरण?

मुंबईतील प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरातील दानपेटीतील कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी अपहाराच्या चर्चेदरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिद्धिविनायक मंदिरातही दरवर्षी १८ कोटी रुपयांची चोरी होत असल्याचा दावा केल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला. मात्र, या दाव्यानंतर सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर यांनी हा दावा फेटाळत स्पष्टीकरण दिले असून, गैरसमज निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत