Headlines

Praveen Darekar Slams Shinde Sena Leaders Over Abhijeet Dipke Visit


‘नीट’ पेपरफुटीच्या मुद्यावर सरकारला धारेवर धरणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके यांचे आंदोलन यशस्वी झाल्यानंतर, आता त्यांच्या घरी राजकीय नेत्यांची रांग लागली आहे. विशेषतः एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी अभिजीत दिपके यांची घेतल

.

अभिजीत दिपकेची भेट घेतल्यामुळे भाजप नेते आणि आमदार प्रवीण दरेकर यांनी महायुतीतील घटकपक्ष शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले. “विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर राजकीय पोळी भाजत आहेत, हे मी समजू शकतो. पण अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्यासारखे सत्तेत सहभागी असलेले नेते जर अभिजीत दिपकेच्या घरी जात असतील, तर त्यातून जनतेत अजिबात चांगला संदेश जात नाही,” असे प्रवीण दरेकर म्हणाले.

स्पष्टीकरण मागत दरेकरांचा सवाल

“ज्या आंदोलनाच्या नेतृत्वाने थेट केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला, त्याच नेत्याच्या घरी जाऊन भेट घेणे हे महायुतीचा धर्म म्हणून योग्य नाही. संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांच्या मनात नेमके काय चालले आहे? याचे त्यांनी स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे,” अशी मागणी दरेकरांनी केली. तसेच, नीट प्रश्नावर आता कडक कायदा मंजूर झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सरकारवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित केल्याचेही दरेकर यांनी नमूद केले.

दिपकेंची भेट म्हणजे बच्चू कडूंची केवळ नौटंकी

यावेळी प्रवीण दरेकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. “शिंदे गटाकडून आमदारकी मिळवूनही त्यांना अपेक्षित प्रसिद्धी मिळालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारची नौटंकी केल्यावर माध्यमातून प्रसिद्धी मिळते, हे त्यांना चांगलेच ठाऊक आहे. ‘सत्तेतला माणूस विरोधात बोलतोय’ हे माध्यमांसाठी खाद्य असते आणि बच्चू कडू हेच वारंवार करत राहतील,” अशी जळजळीत टीका दरेकरांनी केली.

वरिष्ठांनी समज देण्याची मागणी

बच्चू कडू यांच्या अशा कृत्यांमुळे महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात वितुष्ट वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या वरिष्ठांनी त्यांना योग्य ती समज द्यावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.

ठाकरे आणि शिंदे दोन्ही गटांची दिपकेंशी जवळीक

दरम्यान, अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासूनच ठाकरे गटाने भक्कम पाठिंबा दिला होता. माजी खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी नुकतीच दिपके यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. एवढेच नव्हे, तर खैरे यांनी दिपकेंच्या आई-वडिलांचे थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर बोलणेही करून दिले. ठाकरे गट सक्रिय असतानाच, संजय शिरसाट यांनी ‘नातेवाईक’ असल्याचे सांगत, तर बच्चू कडू यांनीही दिपकेंची भेट घेतल्यामुळे शिंदे गटही आता ‘CJP’च्या संस्थापकाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या ‘भेटीगाठींच्या’ राजकारणावरून आता महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे.

हे ही वाचा…

अभिजित दिपके यांची प्रकृती बिघडली:नागरिकांशी संवाद साधताना मळमळ आणि उलटीचा त्रास, भेट सोडून परतले

‘कॉकरोच जनता पार्टी’चे नेते अभिजीत दिपके यांच्या आरोग्याबाबत एक महत्त्वाची आणि काळजी वाढवणारी माहिती समोर आली आहे. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान दिपके यांची प्रकृती अचानक खालावली. संवाद सुरू असतानाच त्यांना तीव्र मळमळ आणि उलटीचा त्रास होऊ लागल्याने, त्यांना हा कार्यक्रम अर्धवट सोडून घरी परतावे लागले. सविस्तर वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत