Headlines

Chhatrapati Sambhajinagar Tukaram Mundhe MS Amol Milk Dairy FDA Raid Seizes Soybean Oil Stock Worth 3 Lakh; सोयाबीन तेलापासून बनवायचे तूप अन् पनीर! अमोल डेअरीवर FDAची धाड; 3 लाखांहून अधिकचा साठा जप्त, अधिकारीही अचंबित


Chhatrapati Sambhajinagar FDA Raid : अन्न व औषधी विभागाच्या ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत शहरात धडक कारवाईची मालिका सुरूच आहे. शहरात भेसळयुक्त पनीर, गाईचे तूप याबाबत मोहीम राबवून तीन लाख 12 हजार 380 रुपयांचे दुग्धजन्य पदार्थ व खाद्यतेल जप्त करण्यात आले.

Chhatrapati Sambhajinagar FDA Raid
छत्रपती संभाजीनगर मेसर्स अमोल डेअरी छापा(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळखोरांविरोधात थेट अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई केली आहे. सुरक्षित अन्न, सुरक्षित महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत चिकलठाण एमआयडीसी परिसरातील ‘मेसर्स अमोल दूध डेअरी’वर छापा टाकून नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलापासून बनावट गाईचे तूप, क्रीम आणि ॲनालॉग पनीर तयार करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. एफडीएच्या पथकानं या ठिकाणी धाड टाकून तब्बल 3 लाख 12 हजार 380 रुपयांचा दुग्धजन्य पदार्थ आणि सोयाबीन तेलाचा साठा जप्त केला आहे.

गैर-खाद्य सोयाबीन तेलाचे 10 ते 12 बॅरल्स जप्त

गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या पथकाने चिकलठाणा एमआयडीसीतील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट नंबर सी-45 येथील ‘मेसर्स अमोल दूध डेअरी’ (मालक दामोदर केदार) या उत्पादन युनिटवर मध्यरात्री छापा टाकला. झाडाझडती दरम्यान पथकाला येथे 10 ते 12 ‘नॉन-फूड ग्रेड’ सोयाबीन तेलाचे बॅरल्स आढळून आलं. या सोयाबीन तेलाचा वापर चक्क बनावट गाईचं तूप, क्रीम आणि पनीर बनवण्यासाठी केला जात असल्याचं तपासात स्पष्ट झालं.
Maharashtra TimesAtul Chavan : पत्नी भाजप आमदार, PWD तील मुख्य अभियंते अतुल चव्हाणांचा तडकाफडकी राजीनामा, व्हॉट्सअप स्टेटसची चर्चा

एफडीएने या डेअरी युनिटमधून खालीलप्रमाणे तब्बल 950 किलोचा साठा जप्त केला आहे:

सुट्टे तूप : 299 किलो (किंमत 1,67,440)
सुट्टी साय/क्रीम : 199 किलो (किंमत 55,720)
पनीर : 174 किलो – 35 ब्लॉक्स (किंमत 45,240)
रिफाइंड सोयाबीन तेल : 278 किलो (किंमत 44,480)

‘लक्ष्मी डेअरी’च्या 3 रिटेल दुकानांवरही धाड

तपासात धक्कादायक बाब समोर आली की, हे अमोल दूध डेअरी शहरातील प्रसिद्ध ‘लक्ष्मी डेअरी’च्या तीन मुख्य रिटेल काऊंटर्सना (टीव्ही सेंटर एरिया, कामगार चौक आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक) या भेसळयुक्त तूप व पनीरचा पुरवठा करत होती. एफडीएनं तातडीनं या तिन्ही दुकानांवर धाडी टाकून तेथील अन्न नमुने घेतले आणि 29 हजार 300 रुपये किमतीचे 41 किलो गाईचे तूप जप्त केलं.
Maharashtra TimesTukaram Mundhe : मंत्रालय-विधानभवनाच्या कँटीन फ्रीजपेक्षा चप्पल स्टँड स्वच्छ, सरकारी आस्थापनांवर कारवाई का नाही? कोर्टाने FDA ला झापलं

परवाना तत्काळ निलंबित, आस्थापना केली बंद

नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अमोल दूध डेअरीचा अन्न सुरक्षा परवाना एफडीएनं तत्काळ प्रभावाने निलंबित केला असून ते उत्पादन युनिट पूर्णपणे सील करून बंद करण्यात आलं आहे. ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रज्ञा सुरसे, फरीद सिद्दीकी, योगेश चिभाडे, सहाय्यक आयुक्त दयानंद पाटील आणि सह आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा