Affordable lunch India: एका कंपनी महागाईच्या काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण देत आहे. या जेवणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.

१० रुपयांत मिळतं असं जेवण
हा व्हिडीओ thenameisanand01 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका सुरक्षा रक्षकाला पाहू शकता, जो १० रुपयांत मिळणाऱ्या व्हेज थाळीचं अनबॉक्सिंग करत आहे. या थाळीत पापड, कारल्याची भुर्जी, सोयाबीनची भाजी, भात, डाळ आणि कांदा असा पौष्टिक आहार दिला आहे. बरं, १० रुपयांच्या मानाने पदार्थांचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. किंबहुना, एक व्यक्ती अगदी पोटभर जेवल्यानंतरही थोडंसं अन्न उरेल, इतकं हे जेवण आहे. त्यामुळे महागाईच्या काळात इतक्या कमी किमतीत दर्जेदार जेवण मिळत असल्याने अनेकांनी कंपनीचं कौतुक केलं आहे.
नेटकरी म्हणाले, जेवणासाठी प्लास्टिकची पिशवी टाळा
हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, ५०० हून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी इतक्या कमी किमतीत जेवण देणाऱ्या कंपनीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी जेवण पॅक करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याऐवजी स्टीलचा डबा वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. असो, या जेवणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

