Headlines

Security Guard Reveals 10 rs Company Lunch Internet Left Amazed | १५० रुपयांचं जेवण फक्त १० रुपयांत! कंपनी कर्मचाऱ्यांना देतेय पौष्टिक व्हेज थाळी, पदार्थ पाहून व्हाल थक्क


Affordable lunch India: एका कंपनी महागाईच्या काळातही आपल्या कर्मचाऱ्यांना अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण देत आहे. या जेवणाचा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकरी मात्र आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Security guard 10 Rs lunch
(फोटो सौजन्य – thenameisanand01/Instagram)
गेल्या काही काळात महागाई किती वाढली आहे, हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. अगदी कालपर्यंत जी भाजी फुटपाथवर १० ते १५ रुपयांत मिळत होती, त्यासाठी आता किमान ३० ते ४० रुपये मोजावे लागतात. त्यामुळे अन्नपदार्थांचे दरही कमालीचे वाढले आहेत. अगदी फुटपाथवर ५०-६० रुपयांत मिळणारी व्हेज थाळी आज किमान १०० रुपयांना विकली जात आहे. मात्र, या महागाईच्या काळातही एका व्यक्तीला अवघ्या १० रुपयांत पोटभर जेवण मिळत आहे. होय, विश्वास बसत नसेल तर हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा. एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. सुमारे १५० रुपयांची थाळी त्याला अवघ्या १० रुपयांत मिळत आहे. त्यात मिळणाऱ्या पदार्थांचं प्रमाण पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

१० रुपयांत मिळतं असं जेवण

​ ​

हा व्हिडीओ thenameisanand01 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही एका सुरक्षा रक्षकाला पाहू शकता, जो १० रुपयांत मिळणाऱ्या व्हेज थाळीचं अनबॉक्सिंग करत आहे. या थाळीत पापड, कारल्याची भुर्जी, सोयाबीनची भाजी, भात, डाळ आणि कांदा असा पौष्टिक आहार दिला आहे. बरं, १० रुपयांच्या मानाने पदार्थांचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. किंबहुना, एक व्यक्ती अगदी पोटभर जेवल्यानंतरही थोडंसं अन्न उरेल, इतकं हे जेवण आहे. त्यामुळे महागाईच्या काळात इतक्या कमी किमतीत दर्जेदार जेवण मिळत असल्याने अनेकांनी कंपनीचं कौतुक केलं आहे.

नेटकरी म्हणाले, जेवणासाठी प्लास्टिकची पिशवी टाळा

​ ​

हा व्हिडीओ १५ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच, ५०० हून अधिक नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी इतक्या कमी किमतीत जेवण देणाऱ्या कंपनीचं कौतुक केलं आहे. तर काहींनी जेवण पॅक करण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण त्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. त्याऐवजी स्टीलचा डबा वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. असो, या जेवणाबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया द्या.

(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा