Headlines

Yavatmal ertiga car was washed away in heavy rain father survived wife and daughters missing; मुसळधार पावसात इर्टिगा कार गेली वाहून; फक्त बाप वाचला, पत्नीसह दोन मुली बेपत्ता


रवी राऊत, यवतमाळ: राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत असताना यवतमाळ जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. दारव्हा तालुक्यातील दहेली येथील कुपटी नदीवरील पुलावरून पुराच्या पाण्यात आर्टिगा कार वाहून गेल्याची हृदयद्रावक घटना घडली. या दुर्घटनेत अविनाश खंडारे यांनी प्रसंगावधान राखत स्वतःचा जीव वाचवला, मात्र त्यांची पत्नी माधवी खंडारे आणि दोन चिमुकल्या मुली प्राची व साची या तिघी पुराच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेल्या असून शनिवारी सकाळपर्यंत त्यांचा शोध सुरू होता. या घटनेमुळे दारव्हा तालुक्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, राळेगाव येथे कौटुंबिक कार्यक्रम आटोपल्यानंतर अविनाश खंडारे हे पत्नी माधवी व दोन मुलींसह नातेवाईकांना बोरीअरब इथं सोडण्यासाठी गेले होते. तेथून ते आपल्या लोणी गावाकडे परतत असताना दहेली येथील कुपटी नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी वाहत होते. पुलावरून पाणी वाहत असतानाही वाहन पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुराच्या पाण्याचा वेग आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने काही क्षणांतच इर्टिगा कार पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली.

कार वाहू लागल्यानंतर अविनाश खंडारे यांनी धाडस दाखवत वाहनातून बाहेर पडून जवळील झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचवला. मात्र पत्नी माधवी आणि मुली प्राची व साची यांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. तिघीही पुराच्या पाण्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्रीपासून युद्धपातळीवर शोध व बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून नदीपात्र, किनारी भाग आणि आसपासच्या परिसरात बेपत्ता तिघींचा शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, बेपत्ता झालेल्या माधवी खंडारे या लोणी येथील आश्रम शाळेत मानधन तत्त्वावर शिक्षिका म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या दुःखद घटनेमुळे लोणी गावासह संपूर्ण दारव्हा तालुक्यात शोककळा पसरली आहे. प्रशासनाने नागरिकांना पुराचे पाणी असलेल्या पुलांवरून किंवा रस्त्यांवरून वाहन नेण्याचा कोणताही धोका पत्करू नये, पाण्याचा वेग कमी होईपर्यंत सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या सूचनांचे पालन करावे, असं आवाहन केलं आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत