Headlines

महाराष्ट्रासह गुजरातेत आज मुसळधार पावसाचा इशारा, सेना सज्ज:गुजरातेत शाळा-कॉलेज बंद; हरिद्वारमध्ये गंगा धोक्याच्या पातळीवर




जुलै महिना संपता संपता संपूर्ण देशभरात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज गुजरात, सौराष्ट्र-कच्छ, मध्य महाराष्ट्रात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासांत 204mm पेक्षा जास्त पाऊस. तर पंजाब, अरुणाचल, केरळ, कोकण-गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटकात ऑरेंज अलर्ट आहे. दरम्यान, गुजरातमध्ये आज सर्व शाळा-महाविद्यालय बंद राहतील. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात 12 इंचपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये अजूनही 130 रस्ते बंद आहेत. आसाममध्ये पुरामुळे मृतांचा आकडा 80 वर पोहोचला आहे. राज्यात पूरग्रस्तांची संख्या घटून 2 लाख झाली आहे. डोंगराळ आणि मैदानी भागांत सततच्या पावसामुळे हरिद्वारमध्ये गंगा नदी धोक्याच्या पातळीजवळ पोहोचली आहे. सॅटेलाइट नकाशात पहा, गुजरातवर दाटलेले ढग देशभरात हवामानाशी संबंधित फोटो… देशभरातील हवामानाच्या अपडेट्ससाठी खालील लाईव्ह ब्लॉग वाचा…



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत