Headlines

US Senate Rejects Bill To Curb Iran Military Action; Trump Senator Absent


तेल अवीव/तेहरान/वॉशिंग्टन डीसी4 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

अमेरिकन सिनेटमध्ये इराणविरुद्ध लष्करी कारवाई मर्यादित करणारा प्रस्ताव पुढे सरकू शकला नाही. यासाठी गुरुवारी मतदान झाले. त्यात हा प्रस्ताव 49 विरुद्ध 50 अशा मतफरकाने फेटाळला गेला. पेनसिल्व्हेनियाचे रिपब्लिकन सिनेटर डेव्ह मॅककॉर्मिक यांनी मतदानात सहभाग घेतला नाही.

सध्या हे विधेयक सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीमध्ये अडकले आहे. प्रस्ताव सादर करणाऱ्या खासदारांना तो संपूर्ण सिनेटमध्ये चर्चा आणि मतदानासाठी सादर करायचा होता. पण आता ते संपूर्ण सिनेटमध्ये आणण्यासाठी खासदारांना पुन्हा प्रयत्न करावे लागतील.

हा प्रस्ताव पुढे सरकला असता, तर इराणविरुद्ध हल्ले सुरू करण्यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना संसदेची मंजुरी घेणे आवश्यक झाले असते. म्हणजेच, राष्ट्राध्यक्ष एकट्याने असा निर्णय घेऊ शकले नसते.

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अलीकडील इराणवरील हल्ल्यानंतर, विरोधी खासदार सातत्याने मागणी करत आहेत की, अशा कोणत्याही लष्करी मोहिमेवरील अंतिम निर्णय संसदेच्या मंजुरीनेच व्हावा.

गुरुवारी अमेरिकन संसदेच्या सिनेटमध्ये इराण युद्ध थांबवण्यासाठी बैठक झाली.

गुरुवारी अमेरिकन संसदेच्या सिनेटमध्ये इराण युद्ध थांबवण्यासाठी बैठक झाली.

गेल्या 24 तासांतील 5 मोठे अपडेट्स…

1. युद्धात पहिल्यांदाच इजिप्तवर हल्ला: इजिप्तच्या बंदरावर ड्रोन हल्ल्यात दोन जहाजांना आग लागली. या हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले जात आहे.

2. अमेरिकेचा 10 इराणी शहरांवर हल्ला: अमेरिकन सैन्याने इराणवर मोठे हवाई हल्ले केले. बंदर अब्बास, किश आणि केशम बेटांवर स्फोटांची माहिती आहे.

3. इराणचा प्रतिहल्ला: रिव्होल्यूशनरी फोर्सने सांगितले की, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर त्यांनी कुवेत आणि जॉर्डनमधील अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य केले.

4. कुवैतमधील चिनी कंपनीच्या इमारतीवर हल्ला: इराणी हल्ल्यात उत्तर कुवैतमधील एका चिनी कंपनीच्या इमारतीवर हल्ला झाला, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.

5. रेड सीच्या सुरक्षेसाठी सौदी युती बनवत आहे: रेड सी (लाल सागर) मध्ये जहाजांच्या सुरक्षेसाठी सौदी एक आंतरराष्ट्रीय युती (गठबंधन) बनवणार आहे. आतापर्यंत 14 देशांनी यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

इराण युद्धाशी संबंधित अपडेट्ससाठी खालील ब्लॉग वाचा…

लाइव्ह अपडेट्स

5 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

इराण म्हणाला- नागरिकांच्या मृत्यूचे उत्तर अमेरिकेला देणार

केशम बेटावरील नागरिकांच्या मृत्यूची किंमत अमेरिकेला मोजावी लागेल, असे इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर घलिबाफ यांनी म्हटले आहे. केशम बेटावर झालेल्या बॉम्बस्फोटामुळे नागरिकांचे जे बळी गेले, त्याची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेचीच आहे, असा ठाम दावा घलिबाफ यांनी केला.

13 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

इराण म्हणाला- होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहणार, अमेरिकन हल्ल्यांना आजच प्रत्युत्तर देणार

इराणच्या ‘रिव्होल्युशनरी गार्ड्स’ने (IRGC) स्पष्ट केले आहे की, होर्मुझची सामुद्रधुनी बंदच राहील आणि आक्रमकाला आज शिक्षा दिली जाईल. अमेरिकेकडून रात्री उशिरा करण्यात आलेल्या जोरदार हवाई हल्ल्यांनंतर हे विधान करण्यात आले आहे. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा इराणने कथित प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर, इराणच्या एका बेटावर हे हल्ले करण्यात आले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत