Headlines

Pune Cyber Crime: काही हजारांचा मोह, जेलवारी नक्की! पुण्यात ‘म्युल अकाउंट’प्रकरणी 15 दिवसांत 60 जणांवर गुन्हे


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी : काही हजार रुपये मिळतील, या मोहापायी स्वतःचे बँक खाते इतरांच्या वापरासाठी देणाऱ्या नागरिकांवर आता कायदेशीर कारवाईची कुऱ्हाड कोसळू लागली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात अवघ्या १५ दिवसांत ‘म्युल अकाउंट’ प्रकरणात ६० जणांवर गुन्हे दाखल झाल्याने सायबर गुन्हेगारांनी शहरात उभारलेल्या आर्थिक लुटीच्या साखळीचे भीषण वास्तव समोर आले आहे.

विशेष म्हणजे, यातील अनेकांना आपण थेट सायबर गुन्ह्याचा भाग बनलो आहोत, याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे काही हजारांच्या कमिशनच्या बदल्यात नागरिक स्वतःच गंभीर कायदेशीर संकट ओढवून घेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Maharashtra TimesFarmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या…
सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया माध्यमांद्वारे गुन्हेगार नागरिकांशी संपर्क साधतात. ‘बँक खाते वापरायला द्या, कमिशन मिळेल’, ‘वर्क फ्रॉम होम’, ‘क्रेडिट स्कोअर वाढवून देतो’, ‘गेमिंग किंवा ट्रेडिंगचे पैसे तुमच्या खात्यात येतील’ अशा विविध आमिषांद्वारे त्यांचा विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीची बँक खात्याची माहिती, कागदपत्रे किंवा ऑनलाइन व्यवहारांशी संबंधित तपशील मिळवून त्या खात्याचा वापर सायबर फसवणुकीतील रक्कम फिरविण्यासाठी केला जातो.

सायबर फसवणुकीतून उकळलेली रक्कम प्रथम अशा खात्यांमध्ये जमा केली जाते. त्यानंतर काही मिनिटांतच ती वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये, ई-वॉलेटमध्ये किंवा इतर माध्यमांतून पुढे वर्ग केली जाते. त्यामुळे मूळ गुन्हेगारांचा माग काढणे कठीण होते. मात्र, तपासाची पहिली साखळी संबंधित खातेधारकापर्यंत पोहोचत असल्याने त्यालाच पकारवाईला सामोरे जावे लागते.

Maharashtra TimesMaharashtra Politics : चर्चा बंद, संपर्क सुरुच! दोन्ही NCP विलिनीकरणाची दारं अजूनही किलकिली, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ खासदाराचे सूचक विधान
गंभीर परिणाम
‘म्युल अकाउंट’ चा वापर झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधित बँक खाते गोठवले जाऊ शकते. त्यानंतर खातेधारकाला बँकेची चौकशी, पोलिस तपास, न्यायालयीन प्रक्रिया; तसेच आर्थिक व्यवहारांवरील निर्बंधांना सामोरे जावे लागू शकते. आपण निष्पाप असल्याचे सिद्ध करण्यासाठीही दीर्घकाळ खर्ची पडू शकतो.

‘टार्गेट’ कोण ?
बेरोजगार तरुण, विद्यार्थी, नव्याने बँक खाते उघडलेले नागरिक, आर्थिक अडचणीत असलेले नागरिक, अर्धवेळ नोकरी शोधणारे युवक आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेले वापरकर्ते हे सायबर टोळ्यांचे प्रमुख लक्ष्य असतात. ‘घरबसल्या कमाई’, ‘झटपट उत्पन्न’ किंवा ‘खाते भाड्याने द्या’ अशा संदेशांद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचले जाते.

Maharashtra TimesPune News : पुणे एक कोटीचं दरोडा प्रकरण; डोळ्यात मिरचीची पूड फेकून बॅगा हिसकावल्या, चोरीला पोलिसांचीच साथ; कारवाईनंतर वर्दी अन् पैसेही गेले
‘म्युल अकाउंट’चे ‘रेड फ्लॅग’ ओळखा
कोणतेही काम न करता केवळ बँक खाते वापरू दिल्याबद्दल कमिशन देण्याची ऑफर, ‘तुमच्या खात्यात पैसे येतील, ते दुसऱ्या खात्यात पाठवा’ अशा सूचना, नवीन बँक खाते उघडण्याचा आग्रह, एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड किंवा नेट बँकिंगची माहिती मागणे, अशा ऑफर येणे ही ‘म्युल अकाउंट’ची प्रमुख लक्षणे मानली जातात. यातील कोणती ऑफर आल्यास त्याला बळी न पडता तत्काळ सायबर पोलिसांकडे माहिती द्यावी.

सायबर गुन्हेगार नागरिकांची बँक खाती वापरून फसवणुकीची रक्कम फिरवत आहेत. थोड्याशा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे खाते इतरांना देणे हा गंभीर गुन्हा आहे. कोणत्याही परिस्थितीत बँक खाते, एटीएम कार्ड, चेकबुक, ओटीपी किंवा ऑनलाइन बँकिंगची माहिती इतरांना देऊ नये. संशयास्पद व्यवहार आढळल्यास तत्काळ १९३० हेल्पलाइन किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे नोंदणी पोर्टलवर तक्रार करावी. –रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत