Headlines

Sanjay Raut says Devendra Fadnavis will be next Union Education Minister slams PM Narendra Modi; नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस यांनाच पुढचे शिक्षण मंत्री करणार, संजय राऊत यांना खात्री, कुठे राहायचं हे देवेंद्र त्यांच्या हातात नाही!


Sanjay Raut on Devendra Fadnavis : देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सुरु आहे, असं खासदार संजय राऊत म्हणाले

Devendra Fadnavis Sanjay Raut Narendra Modi Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय शिक्षण मंत्री करण्याची इच्छा आहे, असा दावा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला. फडणवीस अतिशय योग्य व्यक्ती आहेत, महाराष्ट्रात राहणार असं ते सांगत असले, तरी कुठे राहायचं हे त्यांच्या हातात नसल्याचंही राऊत म्हणाले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीसांनी केलेल्या दिल्ली दौऱ्याचं गुपित हेच होतं का, असा सवाल विचारला जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

पत्रकारांशी संवाद साधताना खासदार संजय राऊत म्हणाले, की “विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्याचे आदेश कोणी दिले? अतिशय निर्घृणपणे, काठीला खिळे लावून लाठीचार्ज केला, अश्रूधूर सोडले, पोलिसांकडून विद्यार्थिनींचा विनयभंग झाला, यावर संसदेत सरकारला प्रश्न विचारले जातील. एवढं सगळं होऊनही मोदी माफी का मागत नाहीत? आम्हाला कोणती कायद्याची भाषा शिकवली जाते? कोणत्या कायद्याने सार्वजनिक संपत्ती अदानींच्या घशात घातली?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

केंद्रीय मंत्र्यांची मुलं परदेशी शिक्षणाला

“देशातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू हे केंद्र सरकार नव्हे, तर संघाने नेमले आहेत. त्यांच्या नेतृत्वात काय शिक्षण दिलं जाणार हा सवालच आहे. किती केंद्रीय मंत्र्यांची, भाजपशासित मुख्यमंत्र्यांची, खासदारांची मुलं परदेशी विद्यापीठात शिकत आहेत, हे मोदींनी जाहीर करावं, त्यांची मुलं सुरक्षित वातावरणात परदेशी शिकत आहेत, उद्योग नोकरी करत आहेत. मात्र संघाच्या दृष्टीने बनवलेल्या अभ्यास पद्धतीत गरीबांच्या मुलांना शिकायला सांगताय. आधी तुमची मुलं इथे आणा, त्यांना इथे शिकायला लावा. आमची मुलं या बोगस शिक्षण पद्धतीत शिकत आहेत” असं संजय राऊत म्हणाले.
Maharashtra TimesArchita Rahar : प्रधानांचा राजीनामा, भाजप खासदाराच्या कन्येची आनंदात इन्स्टा पोस्ट, डिलीट करण्याची सूचना मिळताच म्हणाली, आता आईला फोन करतील

नेहरुंपासून शिक्षण पद्धत आधुनिक

“या देशाची शिक्षण पद्धती पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या काळापासून आधुनिकच आहे, इंदिरा गांधी, राजीव गांधी, मनमोहन सिंह हे आधुनिक विचारसरणीचे नेते होते. तंत्रज्ञानाचं युग नेहरु ते गांधींपर्यंत त्यांनीच आणलं. मात्र भाजपने आधुनिकता मारुन महाभारतकालीन शिक्षण पद्धतीत नेलं. आधीचे पंतप्रधान सुशिक्षित होते. त्यांनी देशात आयआयटी आयआयएम स्थापन केलं. तुम्ही काय केलंत गोशाळा? तरुणांना पकोडे तळायला सांगता, चहा विकायला सांगता” असा संतापही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

Who Is The Next Union Education Minister? Ashok Chavan म्हणाले नांदेडला Ministry मिळाली तर आनंदच!

‘फडणवीसांना शिक्षण मंत्री करणार’

नंदन नीलेकणी यांच्या नेतृत्वात टास्क फोर्स स्थापन केला आहे. पण ते काही करेपर्यंत मोदी सत्तेवर राहणार नाहीत. मोदींनी संघाचे स्वयंसेवक मंत्रि‍पदी नेमण्याचं काम सुरु केलं आहे. नीलेकणींना शिक्षण मंत्री करा. गेला बाजार तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा विचार करताच आहात. ते योग्य व्यक्ती आहेत. त्यांनाच शिक्षण मंत्री केलं जाईल, हे मी ठामपणे सांगतोय. ते कितीही नाही म्हणाले, तरी तेच पुढचे शिक्षण मंत्री आहेत. कुठे राहणं त्यांच्या हातात नाही. उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणं त्यांच्या हातात नव्हतं. कमिश्नरचा तेव्हा हवालदार केला. मोदी-शहांनीच आदेश दिले की जमादार व्हा. भाजपमध्ये स्वाभिमान किंवा मेरीट आहेच कुठे. या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल, तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव सुरु आहे. आम्ही मनकवडे आहोत.” अशा शब्दात राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं.
Maharashtra TimesSanjay Jadhav : साथ सोडली, नाराजी मांडली, तरी म्हणतात उद्धव साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! ठाकरेंना सोडणाऱ्या संजय जाधवांच्या पोस्टने आश्चर्य
“मोदींनी कुठला ऐतिहासिक निर्णय घेतला, ज्यासाठी त्यांचे आभार मानले जात आहेत. राजीनामा घेणं गरजेचं होतं असं भाजप कार्यकर्त्यांनाही वाटतं का? त्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी बलिदान दिलं, २० जणांनी जीव दिला, अनेकांची डोकी फुटली, मुलींचे विनयभंग झाले. तुम्ही भररस्त्यात मुलींचे कपडे फाडले, वस्त्रहरण केलं.” अशी टीकाही संजय राऊत यांनी केली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा