जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. देशातील मंदिरं ही आचार्यांची समती गठीत करुन त्यांच्या ताब्यात द्यावीत, अशी मागणी नरेंद्राचार्य महाराजांनी केली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावर जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी मोठी मागणी केली आहे. “राम मंदिरामध्ये झालेल्या चोरीमुळे हिंदू धर्मियांच्या हृदयाला ठेच पोहचलेली आहे. चोरीची गोष्ट अत्यंत निंदनीय आहे. मुस्लिमांच्या मशिदी, ख्रिश्चनांचे चर्च जसे त्यांच्या ताब्यात आहेत, तशी हिंदूंची सर्व मंदिरं अधिकृत शंकराचार्य, रामानंदाचार्य, वल्लभाचार्य अशा आचार्यांची समिती गठीत करून त्यांच्या ताब्यात द्यावीत”, अशी मागणी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य महाराज यांनी केली आहे. “मंदिरं कशी चालवली पाहिजेत याचं प्रशिक्षण शासनाला नाही, शासन हे निधर्मवादी आहे”, असं नरेंद्राचार्य महाराज म्हणाले.
“धर्म, धर्माची संस्कृती, अध्यात्म, धर्माची काळजी घेणं हे शासनाला कळणार नाहीत. त्यांना कळावं ही अशी इच्छा ठेवणं पण चुकीचे आहे. त्यामुळे आचार्यांची समिती गठीत करून त्यांच्या ताब्यात मंदिरं द्यावीत”, अशी मोठी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांनी केली.
आमच्या ताब्यात मंदिरं द्या, नरेंद्राचार्य महाराजांची मागणी
“मंदिरं आमच्या ताब्यात आली तर त्याची धार्मिकता जपता येईल. जिथे शासन आपला अंकुश ठेवेल तिथे कर्मचारी येणार आणि माणूस म्हटलं की, चुका करणारच. झालेली गोष्ट निंदनीय आहे. सरकारने त्यावर पावलं उचलली आहेत. तसेच या प्रकरणात अटक पण झालेली आहे. पण सनातनी लोकांच्या हृदयाला जी ठेच पोहचली आहे, ती भरपाई कोणी भरून देऊ शकत नाही”, असं नरेंद्राचार्य महाराज म्हणाले.
“गोरगरिबांनी पै पै जमा करून राम मंदिराला पैसे दिले आहेत आणि तिथे जेव्हा चोरी होते, तेव्हा लोकांच्या भावनेला ठेच पोहचते. शासन कारवाई करेल, पण भावना परत आणता येत नाहीत”, अशी खंत नरेंद्राचार्य महाराज यांनी व्यक्त केली.
विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेवर प्रतिक्रिया
राम मंदिरातील दान चोरी प्रकरणावरुन विरोधकांकडून सरकारवर निशाणा साधला गेला. त्यावरही नरेंद्राचार्य महाराजांनी प्रतिक्रिया दिली. “विरोधकांचं काम त्यांनी केलेलं आहे. विरोधकांनी हिंदूंच्या अस्मिता, प्रेम व्यक्त करू नयेत, असं कुठे लिहिलेलं नाही. देव फक्त हिंदुत्ववादी पक्षांचा नाही, देव सर्वांचा आहे. संविधानाने धर्माला कमी लेखलेलं नाही, विरोधकांनी पण कमी समजू नये. राजकीय मंडळींनी विरोधासाठी विरोध करू नये”, असं मत नरेंद्राचार्य महाराज यांनी मांडलं.
महाराजांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया
नरेंद्राचार्य महाराज यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली. “सरकारने उचललेलं पाऊल अतिशय उत्तम आहे. कठोरातील कठोर कायदे केले पाहिजेत. मुलांच्या आयुष्याशी खेळण्याचा आपल्याला अधिकार नाही. पेपर फुटतात हे आपल्याला शोभनीय नाही. अनेक वेळा हे झाल्याने मुलांच्या रागाचा स्फोट झाला. नुसता राजीनामा घेऊन चालणार नाही, त्यासाठी कायदा केला पाहिजे”, अशी भूमिका नरेंद्रचार्य महाराजांनी मांडली.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा