Suvrat Joshi on Narendra Modi Video: मराठी सिनेविश्वातला अभिनेता सुव्रत जोशी सध्या चर्चेत आहे. देशात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर त्यानं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तरुणाईचा आणि विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीतील जंतर-मंतरपासून ते देशातील कानाकोपऱ्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं असून, या आंदोलनाला विविध सामाजिक व राजकीय स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याच वेळी मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील अभ्यासू व लोकप्रिय अभिनेता सुव्रत जोशी यानंही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विद्यार्थ्यांच्या या लढ्याला आपला पाठिंबा दिला होता.
गेल्या महिन्याभरापासून या मुद्द्यावर मौन बाळगल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ शेअर करत यावर कडक कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिलं. या व्हिडिओची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर नाराजीही दर्शवली आहे. या संदर्भात अभिनेता सुव्रत जोशीनं शेअर केलेली उपहासात्मक पोस्ट चर्चेत आली आहे.
Jana Nayagan collection: तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा बॉक्स ऑफिसवर ‘विजय’, ‘जन नायकन’ नं पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई Fraandsss, कालपर्यंत Chinese agent असलेल्या, साधे वैज्ञानिक म्हणायला लायक नसलेल्या, थेट पाकिस्तान मध्ये जाऊन कॉन्फरन्स केलेल्या, स्वतःच्या नावावर एकही पेटंट नसलेल्या, केवळ स्वतःच्या NGO ला परदेशी फंडिंग मिळणार नाही हा क्षुल्लक कारणावरून..शिक्षणाचे कारण देऊन उपोषणाला बसलेल्या सोनम जी वांगचुक यांना अचानक काल रात्री भाजप चे प्रमुख स्वतः जाऊन उपोषण तोडायला मदत करतात. माननीय पंतप्रधान त्यांना तब्येत सांभाळायला सांगतात. आणि त्यांच्याबद्दल गौरवास्पद बोलतात.
सोनम जी आता चीनचे एजंट आहेत की नाही? या मास्टर स्ट्रोक चा आम्ही आम्ही स्पिनर्स नी कसा अर्थ लावावा? सोनम जीना पाठिंबा दाखवणारे “आम्ही किडे” आता फुलपाखरू झालो का?
सुव्रतची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी यावर वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा