Karanvir Bohra Divorce : लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहराच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत असून अभिनेत्यानं यावर मौन सोडलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धू यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. अशातच आता अभिनेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता म्हणाला की, त्याला आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला आवडतं आणि सध्या या विषयावर भाष्य करायचं नाही.
करणवीर आणि टीजे सिद्धू यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणं बंद केल्यापासून अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर अभिनेत्यानं सोशल मीडियावर टीजेला अनफॉलो केल्यामुळे या चर्चांना हवा मिळाली. आता, ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत करणवीरनं या चर्चांवर भाष्य केलं आहे. अभिनेत्यानं सांगितलं की, त्याला आपलं वैयक्तिक आयुष्य लोकांच्या नजरेपासून दूर ठेवायला आवडतं. करणवीरनं चाहत्यांना त्याच्या प्रायव्हसीचा आदर करण्याचं आवाहनही केलं आहे. Savita Malpekar : ‘काकस्पर्श’साठी केलं टक्कल, इंडस्ट्रीतल्या लोकांनी पसरवली कॅन्सर झाल्याची अफवा; सविता मालपेकरांनी सांगितला अनुभव
घटस्फोटाच्या चर्चांवर काय म्हणाला करणवीर?
करणवीर मुलाखतीत म्हणाला, ‘मला सध्या याबद्दल बोलायचं नाही. जेव्हा मला एखाद्या गोष्टीवर चर्चा करायची नसते, तेव्हा मी आदरानं तसं सांगतो आणि मला आशा आहे की, लोक त्याचा आदर करतील. मला कशाचाही त्रास होत नाही. सोशल मीडिया यूजर्स काही वाईट बोलले तरी मला वाईट वाटत नाही.’
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
करणवीरनं ‘कसौटी जिंदगी की’, ‘शरद’, ‘कुबूल है’ आणि ‘नागिन २’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. करणवीरने ‘बिग बॉस’, ‘खतरों के खिलाडी’, ‘नच बलिये’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘लॉक अप’ यांसारख्या रिॲलिटी शोमध्येही भाग घेतला आहे. अभिनयाव्यतिरिक्त, करणवीरनं निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केलंय.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा