![]()
Marathi Live News: ‘नीट’पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू झालेली लढाई रस्त्यापासून संसदेपर्यंत पसरली आहे. केंद्रावर दबाव वाढत असला, तरी त्यावरील चर्चेबाबतची कोंडी पावसाळी अधिवेशनाच्या बुधवारी, तिसऱ्या दिवशीही कायम राहिली. चर्चेच्या नियम, प्राधान्यक्रमाबाबत सत्ताधाऱ्यांसोबत विरोधकांनीही ताठर भूमिका घेतली असून विरोधकांत तर या मुद्द्यांवर दुफळी निर्माण झाली आहे. जून महिन्यात पावसाने सगळ्यांना वेठीस धरले; पण जुलैमध्ये शहरात बरसलेल्या सरींनी बुधवारी बारा वर्षांचा विक्रम मोडला आहे. पुण्यात एक ते २२ जुलै सकाळी साडेआठपर्यंत ४५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
Source link
Maharashtra Live News 23rd July 2026: दिवसभरातील ताज्या बातम्या, पावसाचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर
