Headlines

Income Tax Notice Genuine or Fake; आयकर विभागाच्या नावाने आलेली नोटीस खोटी आहे की खरी? जाणून घेण्याची पद्धत अतिशय सोपी


Income Tax Fraud: समजा तुम्ही ई-मेल किंवा मोबाईल फोन सुरू केला आणि तुम्हाला प्राप्तिकर विभागाच्या नावे नोटीस आल्याचा दावा करणारा एखादा संदेश (मेसेज) दिसला. आयकर विवरणपत्र दाखल करण्याच्या सीजनमध्ये त्यावर त्वरित प्रतिक्रिया म्हणून तुम्ही लिंक ओपन कराल किंवा लगेच उत्तर द्याल.

पण अशा कोणत्याही नोटीसवर क्लिक करण्यापूर्वीस्वतःला एक महत्त्वाचा प्रश्न विचारा – ही खरोखर प्राप्तिकर विभागाची अधिकृत नोटीस आहे का? की तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती चोरण्याच्या उद्देशाने रचलेला एखादा फसवणुकीचा स्कॅम आहे?

Maharashtra Times8th Pay Commission वर मोठी अपडेट, 2.57 फिटमेंट फॅक्टरवर पगार केवळ 68% वाढणार? कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीचा काय आहे फॉर्म्युला?

बनावट आयकर नोटीसला प्रतिसाद देण्याचे प्रकार

कोणत्याही प्रकारच्या बनावट नोटीसला प्रतिसाद दिल्यास तुमची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती फसवणूक करणाऱ्यांसमोर उघड होण्याचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला आयकर विभागाच्या नावे मिळालेली नोटीस बनावट आहे की खरी याची खात्री करण्याची संधी मिळते, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडण्यापासून वाचू शकतात.

फसवणूक करणारे अगदी खऱ्यासारख्या दिसणाऱ्या बनावट नोटीस पाठवून लोकांची फसवणूक करत आहेत, पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला मिळालेली सूचना अधिकृत आहे की बनावट, हे तुम्ही फक्त 5 मिनिटांत स्वतः तपासून खात्री करू शकता.

Maharashtra TimesChina AI Plan: चीनचा एआयच्या माध्यमातून जगावर राज्य करण्याचा गेमप्लॅन; भारतासह सर्वांसमोर मोठे संकट उभे करणार?; एका चालीने चेकमेट करणार
DIN काय असतं? तुमच्या ओळखीचा सर्वात महत्त्वाचा पुरावा

आयकर विभागाकडून येणाऱ्या प्रत्येक अधिकृत पत्रावर एक विशिष्ट क्रमांक असतो, ज्याला Document Identification Number किंवा DIN म्हणतात. हा 20 अंकी नंबर कम्प्युटरने तयार केलेला युनिक क्रमांक असतो. तुमच्या नोटीसवर DIN नसेल तर ती बनावट असण्याची शक्यता आहे.

पोर्टलवर पडताळणी कशी करावी?

आयकर विभागाची नोटीस मिळाल्यावर तात्काळ कोणतेही पेमेंट करू नका किंवा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. सर्वप्रथम खालील दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करा:

  • आयकर विभागाच्या अधिकृत ई-फायलिंग वेबसाइटवर (incometax.gov.in) जा.
  • तिथे Authenticate Notice/Order Issued by ITD हा पर्याय दिसेल.
  • नोटीसवर छापलेला DIN क्रमांक प्रविष्ट करा.
  • नोटीस खरी असेल तर संपूर्ण तपशील पोर्टलवर दिसेल. तुम्ही पोर्टलमधील e-Proceedings विभागात जाऊन देखील नोटीसची सत्यता तपासू शकता.

खालील गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

  • तुमचा ई-मेल आयडी तपासा: ई-मेल नेहमी अधिकृत डोमेन @incometax.gov.in वरून आला आहे की नाही याची खात्री करा.
  • वैयक्तिक तपशील: नोटीसमध्ये तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि नाव बरोबर लिहिले आहे का तपासा.
  • घाई करू नका: आयकर तज्ञ नोटीस मिळाल्यावर लगेच प्रतिक्रिया न देण्याचा सल्ला देतात. प्रथम काळजीपूर्वक वाचा आणि कोणत्या कलमांतर्गत (जसे की 143(1) किंवा 139(9)) आहे ते पहा.

लक्षात घ्या की पडताळणी किंवा पुनर्मूल्यांकन यासारख्या काही नोटिसा खूप गंभीर असतात आणि त्यांच्यासाठी कडक मुदत असते. त्यामुळे एखाद्या नोटीसच्या महत्त्वाविषयी तुम्हाला खात्री नसल्यास ताबडतोब कर सल्लागार किंवा CA चा सल्ला घ्या.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत