Headlines

Need To Transform Temples Into Energy Centers


  • Marathi News
  • Opinion
  • Pandit Vijay Shankar Mehta Column: Need To Transform Temples Into Energy Centers

9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

देशाने आधी मंदिरांवर हल्ले पाहिले. त्यानंतर मूर्ती भंगताना पाहिले. मग‎आपण एकत्र येऊन मंदिरांचे रक्षण केले, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली.‎आपण मंदिरे यासाठी बनवली होती की ती आपली संकटे दूर करतील.‎हळूहळू मंदिरे स्वतःच संकटात सापडली. मंदिराची मूर्ती, वास्तू आता‎सुरक्षित आहे, पण दानपेट्या सुरक्षित ठेवण्याची गरज निर्माण झाली‎आहे. मंदिर आणि मूर्ती आस्थेपोटी बनतात, पण त्याची व्यवस्था‎माणूसच बनवतो.

संपत्तीच्या बाबतीत माणसामध्ये काही नैसर्गिक दोष‎असतात. प्रचंड संपत्ती आसपास पसरलेली असेल, तर प्रामाणिक‎राहणे ही मोठी तपस्या असते. मोठमोठे तपस्वीसुद्धा संपत्तीच्या वादळात‎विचलित होतात. एक भव्य मंदिर बनताना पाहून एकाने दगड‎फोडणाऱ्या कारागिराला विचारले की, हे मंदिर कुणाचे बनत आहे?‎कारागिराने नेऊन एक लहानसा चौथरा आणि दगड दाखवला, ज्याला‎शिलान्यास पट्टिका म्हणतात. तो म्हणाला, यावर जे नाव लिहिले आहे,‎हे मंदिर त्यांचे बनत आहे. कधीकधी मंदिरात ती पट्टिका आणि त्यावर‎कोरलेली नावेच प्रमुख होतात. आपण मंदिरांना उपद्रवाचे अड्डे‎बनवण्याऐवजी ऊर्जेचे केंद्र बनवले पाहिजे.‎



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत