दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरु असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजी आहे. या सगळ्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या कक्षात ही भेट झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अगदी हाताला धरुन आत आणले आणि त्यांचे स्वागत केले. या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटोही समोर आले आहेत. ही भेट सध्या राजकीय व सामाजिक वर्तुळात प्रचंड चर्चेचा विषय ठरली आहे. विद्यार्थी आंदोलनावरुन कधी नव्हे ते मोदी सरकार कोंडीत सापडले असताना शरद पवार यांची अचानक पंतप्रधानांची भेट का घेतली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. एकीकडे NEET पेपरफुटी प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार कोंडीत सापडले असताना, शरद पवार यांनी प्रत्यक्ष जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दिपके आणि आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. त्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह संसदेत पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली. या भेटीमुळे शरद पवार हे सरकार आणि आंदोलकांमधील कोंडी फोडणारा दुवा ठरणार का, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या NDA सहभागाच्या चर्चांना नवे वळण मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीत नेमकं काय घडलंय तेच या व्हिडिओतून समजून घेऊया…