Headlines

Maharashtra Forecast Update Meteorological Department Issues Orange Alert for Bhandara Gondia Chandrapur and Gadchiroli for Next Three Days; महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय! ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, पुढील तीन दिवस पावसाचं तांडव, हवामान खात्याचा ताजा अंदाज


Vidharbh Nagpur Rain News : विदर्भात पावसाच्या दमदार हजेरीनंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्यान शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतू रस्ते वाहून गेल्यानं वाहनांची चांगलीच गैरसोय झाली आहे.

Bhandara Gondia Chandrapur Orange Alert
महाराष्ट्र भंडारा गोंदिया चंद्रपूर ऑरेंज अलर्ट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जितेंद्र खापरे, नागपूर : विदर्भात मान्सूनने पुन्हा जोरदार पुनरागमन केलं असून पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मध्य भारतात पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा परिणाम विदर्भात दिसून येत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांसाठी पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी 100 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामानाचा अंदाज घेऊनच नियोजन करावं

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पूर्व विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे नदी-नाले, ओढे आणि धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनीही आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
Maharashtra TimesPune Crime : पुण्यात तरुणाला संपवलं, आरोपींची बोनेटला बांधून धिंड; लेक गमावलेल्या माऊलीचा संताप, चपलांनी बदडण्याचा प्रयत्न
दरम्यान, नागपूर, वर्धा तसेच पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळण्याची शक्यता असल्यानं शेतकरी, प्रवासी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच नियोजन करावं, असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.

शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झालं होतं. अनेक ठिकाणी शेतातील पिके कोमेजण्याच्या स्थितीत पोहोचली होती. मात्र, सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जमिनीत पुन्हा ओलावा निर्माण झाल्यानं सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांच्या वाढीस पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात समाधानाचं वातावरण असून वेळेवर झालेला पाऊस पिकांसाठी लाभदायक ठरणार असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
Maharashtra Timesचुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीवर वारंवार अत्याचार, फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन शेतात संतापजनक कृत्य; गरोदर राहिल्यानं पाप उघड

प्रशासनाचं मोठं आवाहन

विशेषतः चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता पूरप्रवण भागातील नागरिकांनी सतर्क राहावं. नदी-नाल्यांजवळ जाणं टाळावं आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. पावसामुळे विदर्भातील तापमानातही लक्षणीय घट झाली असून गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानं उन्हाचा तडाखा कमी झाला आहे. हवामान आल्हाददायक झालं असलं तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा कायम आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा