Headlines

Shekhar Suman : ‘अतिशय प्रोफेशनल, इंटिमेट सीनदरम्यानही स्टार असल्याचा आव आणला नाही’, शेखर सुमननं सांगितला रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव


Shekhar Suman : अभिनेता शेखर सुमननं एका मुलाखतीमध्ये रेखा यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

Shekhar Suman On Rekha
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – शेखर सुमननं आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘उत्सव’ या चित्रपटातून केली. या चित्रपटात रेखा यांनी मुख्य भूमिका साकारली होती. अलीकडेच एका मुलाखतीत शेखर यांनी खुलासा केला की, त्यावेळी रेखा इंडस्ट्रीतील एक मोठ्या स्टार असूनही, त्यांनी शेखर यांना कधीही नवोदित कलाकारासारखं भासवलं नाही.

रेखा यांच्याबद्दल काय म्हणाले शेखर सुमन ?

‘स्क्रीन स्पॉटलाइट’शी बोलताना शेखर म्हणाला की, ‘रेखाजींनी पहिल्या दिवसापासूनच मला खूप चांगली वागणूक दिली. काही कलाकार स्वतः भोवती मोठा लवाजमा घेऊन फिरतात आणि आपण मोठे स्टार असल्याचा आव आणतात. अशा वेळी नवख्या कलाकाराला संकोच वाटतो, पण रेखाजी तशा नव्हत्या. त्या माझ्या शेजारी बसायच्या, माझ्याशी गप्पा मारायच्या आणि मला संकोच वाटणार नाही याची काळजी घ्यायच्या. त्यामुळे कॅमेऱ्यासमोर उभं राहण्यापूर्वीच माझा सगळा ताण दूर झाला होता.’
Maharashtra Times‘लोकशाही असलेल्या देशात हे सगळं सुरुये, माणसाची किंमत कमी झाली’, CJP आंदोलनाला मराठी कलाकारांचा पाठिंबा
रेखा यांचं कौतुक करताना शेखर सुमन म्हणाला की, ‘इंटिमेट सीनच्या शूटिंगदरम्यान त्यांनी कधीही स्टार असल्याचा आव आणला नाही. इथे हात लावू नका किंवा पुन्हा टेक देणार नाही अशा कोणत्याही अटी त्यांनी घातल्या नाहीत. त्या अतिशय साध्या आणि प्रोफेशनल होत्या.’

नखरेल मराठी तारकांचा माज असा उतरवतो, Mahesh Tilekar यांची सनसनाटी मुलाखत

‘माझ्याकडे आलेलं कोणतंही काम मी सहज स्वीकारायचो. ‘उत्सव’ हा सिनेमा खूप मोठा आनंद होता. रेखा यांच्या विरुद्ध भूमिका साकारायला मिळणं हा तर आनंदाचा क्षण होता! त्या एक मोठी स्टार होत्या आणि त्यांची भूमिकाही मोठी होती, पण मीसुद्धा तितकाच महत्त्वाचा होतो आणि सगळ्यांची माझ्याकडे नजर होती. असंही शेखरनं सांगितलं.
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra फेम निमिष कुलकर्णीची भरारी! अभिनेत्याची मराठी सिनेमात वर्णी; चाहते उत्सुक
शेखर सुमननं दिग्दर्शक गिरीश कर्नाड यांचंही कौतुक केलं. अभिनेता म्हणाला, ‘गिरीशजींनी मला सांगितलं होतं, ती रेखा आहे असं समजू नकोस. ते फक्त वसंतसेना हे पात्र आहे, असंच समज. त्यामुळे काम करणं खूप सोपं झालं.’
Maharashtra TimesUjjwal Nikam On Sanjay Dutt : ‘संजय दत्त 1993 चा बॉम्बस्फोट थांबवू शकला असता, तो दहशतवादी नव्हता’, उज्ज्वल निकम यांचा दावा
दरम्यान, याच मुलाखतीदरम्यान शेखर सुमननं माधुरी दीक्षित आणि डिंपल कपाडिया यांच्यासोबतही काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा