Headlines

PM Modi on skyroot हे यश तर 28 वर्षांच्या युवकांचे ! 56 च्या नव्हे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा टोला


► वृत्तसंस्था नवी दिल्ली
संसदेच्या सोमवारपासून प्रारंभ झालेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूभीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परंपरेनुसार देशाला उद्देशून संदेश दिला आहे. या संदेशात त्यांनी ‘स्कायरुट’ या खासगी कंपनीच्या अवकाश क्षेत्रातील यशाचे तोंड भरून कौतुक करतानाच, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोलाही लगावला.

‘स्कायरुट’चे यश 28 वर्षे वयाच्या तरुणांच्या प्रतिभेचे आहे, 56 वर्षे वयाच्या युवकाचे नव्हे, असा टोमणा त्यांनी या संदेशात मारला आहे.
‘आज अंतराळ क्षेत्रापासून भूगर्भापर्यंत प्रत्येक स्थानी भारताचे महत्त्व वाढत आहे. भारताच्या युवा संशोधकांनी अंतराळ क्षेत्रातील प्रगतीच्या एका नव्या प्रवासाचा प्रारंभ केला आहे.

‘स्कायरुट’च्या सर्व शास्त्रज्ञांचे सरासरी वय केवळ 28 वर्षांचे आहे, अशी माहिती मला देण्यात आली आहे. या वयातील तरुणांचे हे यश आहे. आता युवावर्ग विविध क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीचे आधारस्तंभ बनत आहेत, ही भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने आशादायक बाब आहे. या युवकांना प्रोत्साहन देणे हे आमचे उत्तरदायित्व आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

महिन्याभरात अनेक पराक्रम
गेल्या साधारण एक महिन्यात भारताच्या युवकांनी अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने जगाचे लक्ष वेधून घेतले. अवकाश क्षेत्रात संशोधन करणाऱ्या युवकांची खासगी कंपनी असणारे देश जगात अत्यंत कमी संख्येने आहेत. अशा देशांमध्ये भारताचा समावेश असणे, ही देशाच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. राष्ट्रीय स्तरावर असो, आंतरराष्ट्रीय स्तरावर असो किंवा अवकाशात असो, आपला स्पष्ट ठसा उमटविण्यात भारताची युवाशक्ती यशस्वी होत आहे.

भारताचे तरुण शास्त्रज्ञ, अभियंते, संशोधक, उद्योsजक आणि कर्मचारी या साऱ्यांच्या मनात आज देशाच्या प्रगतीसाठी नवनवे योगदान देण्याची आस निर्माण झाल्याचे दिसून येते. केंद्र सरकारच्या अनुकूल धोरणांमुळे ही ‘इकोसिस्टिम’ निर्माण झाली आहे.

आमच्या आर्थिक सुधारणा कार्यक्रमांना मिळालेले हे गोड फळ आहे. नुकतेच राजस्थानात एका भव्य तेलशुद्धीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच देशाच्या तिसऱ्या सेमीकंटक्टर उत्पादन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले आहे. याच महिन्यात भारताच्या प्रथम ‘हरित हैड्रोजन’ रेल्वेचा प्रारंभही झाला. भारताची युवाशक्ती आता जागृत होत असून नवनवी आव्हाने स्वीकारण्यास सज्ज होत आहे, याचेच हे द्योतक आहे. आता देशाला कोणी थांबवू शकत नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.
बॉक्स
आव्हानात्मक काळातही प्रगती
सध्याचा काळ आंतरराष्ट्रीय दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आहे. जगाला अस्थैर्याशी संघर्ष करावा लागत आहे. असे असूनही भारताच्या विकासाचा वेग कमी झालेला नाही.

आपल्या ध्येयमार्गावर भारत आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करीत असून या वाटचालीत भारताचा युवावर्ग अग्रेसर आहे. संसदेच्या वर्षाकालीन अधिवेनाचा प्रारंभ होत असताना, युवावर्गाने भारताचे विविध क्षेत्रांमधील अतुलनीय कामगिरीमध्ये नेतृत्व करणे, हा योगायोग असाधारण आहे.

केंद्र सरकार भविष्यातही युवकांचा उत्साह आणि प्रतिभा संवर्धित करण्यासाठी जे करणे आवश्यक आहे, ते करीत राहील, अशी भलावण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत