Tharala Tar Mag 19 July 2026 Episode Update : आजच्या एपिसोडमध्ये सायली आश्रमाबाबत माहिती करुन घेण्यासाठी मधुभाऊंना भेटते तेव्हा श्वेताचं प्रियाच्या सांगण्यावरुन तिच्यावर बारीक लक्ष असतं.

जेव्हा सायली बाहेर येते तेव्हा ती एकदम ठीकठाक असते. तो तिला एका मागोमाग एक प्रश्न विचारून भंडावून सोडतो. अश्विन तिथेच असतो… तो तिची विचारपूस करतो पण अर्जुन काही ऐकून घेत नाही. आपण आत्ताच्या आता हिरो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया असं तो म्हणतो. अर्जुनची अति घाई बघून सायली त्याच्यावर चिडते. त्यानंतर अश्विन स्वतः ते पॅकेट नीट तपासतो त्यावर फक्त एक दिवसच तारीख उलटून गेलेली असते. पण तरीही अर्जुन काही ऐकायला मागत नाही मग सायली त्याच्यावर चिडते आणि म्हणते की मला काहीही झालं नाही तुम्ही जरा शांत बसा. मला काही वाटलं तर मी सांगेन. मग अर्जुन शांत राहतो पण त्याच्या मनात तिच्यासाठी काळजी ही असते. दुसऱ्या दिवशी उठून सायली एकदम फ्रेश असते तिला कसलाही त्रास झालेला नसतो. घरात सगळ्यांची ऑफिसची लगबग सुरू असते. सगळे ऑफिसला गेल्यावर सायली सुद्धा आश्रमात जाते त्यामुळे गोलूला कल्पना आणि विमल सांभाळतात.
Chaitanya Sardeshpane : तुम्ही एवढे गोरे कसे काय? चाहत्याच्या प्रश्नाला ठरलं तर मग फेम चैतन्यचा मजेशीर रिप्लाय
Tharala Tar Mag प्रिया तुरुंगातून सतत श्वेता ला फोन करत असते त्यामुळे श्वेता वैतागते आणि बोलते की तू अशीच सारखी मला फोन करत राहिलीस तर माझं भांड आत्ताच फुटेल. मला इथे काहीच कुणावर लक्ष ठेवता येणार नाही. प्रियाला पण तिचं म्हणणं पटतं. प्रिया तिला भेटायला बोलावते पण यावरही श्वेता सांगते की तू सांगितलेल्या वेळेनुसार मला बाहेर पडता येणार नाही इथे आश्रमात सगळ्यांना मी साधी भोळी वाटते. मग प्रिया बोलते की यासाठी आता तुला मला हॉस्पिटलमध्ये भेटायला यावं लागेल मी सांगेन तेव्हा तू तिथे ही. त्या दोघी बोलत असतानाच सायली आश्रमात आलेली असते. ती मधु भाऊंना भेटते आणि चहा सांगायला श्वेता कडे आलेली असते. श्वेता सायलीचा आवाज ऐकून दचकते. प्रिया सुद्धा लगेचच फोन कट करते. सायली तिची चौकशी करू लागते किती कोणाशी बोलत होती काय बोलत होती. यावर श्वेता सुद्धा सर्रास प्रियाप्रमाणे तिला थाप मारते ज्यावर सायलीचा विश्वास बसतो.
72 nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा, मराठीत प्रशांत दामलेंच्या सिनेमाने मारली बाजी, तर हिंदीत कार्तिक आर्यन ठरला विजेता, वाचा संपूर्ण यादी
दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य आश्रमात आलेले असतात. ते सुद्धा आश्रमाचं कामकाज समजून घेत असतात. मधु भाऊ श्वेता त्यांच्यावर लक्ष ठेवून असते. मधु भाऊ सायलीला तिची आणि बाळाची काळजी घ्यायला सांगतात तेव्हाच श्वेताला समजतं की सायली सुद्धा प्रेग्नेंट आहे त्यामुळे ती लवकरच ही बातमी प्रिया पर्यंत पोहोचवायची ठरवते. थोड्यावेळाने ती काहीतरी देण्यासाठी म्हणून पुढे येते तेव्हा चैतन्याला तिच्या परफ्युमचा सुगंध हा ओळखीचा वाटतो. तो तिला विचारतो की आपण यापूर्वी कधी भेटलेलो का? हे ऐकताच श्वेता घाबरते आणि एकदम बाजूला जाऊन म्हणते की नाही आपण पहिल्यांदा भेटत आहोत. तरीही चैतन्यला मात्र राहून राहून वाटत असतं की तिच्या परफ्युमचा सुगंध कुठेतरी ओळखीचा आहे. आश्रमात राहणारी मुलगी एवढा महागडा परफ्युम कसा काय वापरले. पण का माझ्या नादात तो तिकडे दुर्लक्ष करतो.
Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली
दुसरीकडे सचिन प्रियाला जाऊन भेटतो. प्रियाने तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी एक प्लॅन बनवलेला असतो. सचिनने एक औषध आणलेलं असतं ज्यामुळे तिच्या पोटात दुखणार पण बाळाला काहीही होणार नाही असं तर म्हणतो. यानिमित्ताने तिला हॉस्पिटलमध्ये जाता येईल आणि श्वेताला भेटता येईल व पुढचा प्लॅन करता येईल हा त्यांचा डाव असतो.

