Headlines

गोवा शिवसेना राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची संजू परब यांनी घेतली सदिच्छा भेट…


सावंतवाडी प्रतिनिधी: गोवा राज्यातील शिंदे शिवसेनेचे राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांची आज सावंतवाडी येथे शिवसेना (शिंदे गट) सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये संघटनात्मक बळकटी, पक्षविस्तार तसेच विविध सामाजिक व राजकीय विषयांवर सविस्तर चर्चा झाली.या प्रसंगी गोवा राज्यप्रमुख उपेंद्र गावकर यांनी संजू परब यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.

यावेळी उत्तर जिल्हाप्रमुख सुनील सांतिनेजकर, कुशावती जिल्हाप्रमुख सुहास खांडोलकर, दक्षिण जिल्हाप्रमुख सुरेंद्र वालवईकर, कमलाकर हुमरसकर, नितेश फडते आदी पदाधिकारी उपस्थित होते.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत