Headlines

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा पिवळ्या साडीतील लुक व्हायरल, साधेपणा तिच्या चाहत्यांना भावला – maharashtrachi hasyajatra fame marathi actress shivali parab yellow saree get fashion idea


मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब ही तिच्या दमदार विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab
फोटो सौजन्य :- @parabshivali
मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब ही तिच्या दमदार विनोदी अभिनयामुळे आणि सहजसुंदर व्यक्तिमत्त्वामुळे प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेल्या शिवालीने आपल्या अभिनयासोबतच फॅशन सेन्समुळेही सोशल मीडियावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच तिचा पिवळ्या साडीतील मोहक लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चाहत्यांकडून त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक पेहरावातही स्टायलिश आणि एलिगंट कसे दिसता येते, याचे उत्तम उदाहरण शिवालीने या लुकमधून दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे तिच्या या लुकमध्ये कोणताही भडकपणा नसून साधेपणा, आकर्षक रंगसंगती आणि मराठमोळा अंदाज यांचा सुंदर मिलाफ पाहायला मिळतो. त्यामुळे सोशल मीडियावर तिच्या या फोटोंची चांगलीच चर्चा रंगली आहे. (फोटो सौजन्य :- @parabshivali)

चंद्रकोरीसारखे प्रिंट्सच्या साडीने वेधले लक्ष

चंद्रकोरीसारखे प्रिंट्सच्या साडीने वेधले लक्ष

शिवालीने परिधान केलेली ही पिवळ्या रंगाची साडी पहिल्याच नजरेत लक्ष वेधून घेते. साडीवर छोटे चंद्रकोरीसारखे प्रिंट्स असून हिरव्या रंगाची आकर्षक बॉर्डर तिच्या लुकला अधिक उठावदार बनवते. या रंगसंगतीमुळे संपूर्ण पोशाखाला पारंपरिक आणि तरीही आधुनिक असा सुंदर टच मिळतो. साडीसोबत तिने गडद हिरव्या रंगाचा हाफ स्लीव्हज ब्लाऊज परिधान केला आहे. ब्लाऊजवरील छोट्या डॉट्सचा डिझाइन साडीशी अगदी सुंदर जुळून येतो.

मिनिमल ज्वेलरीने वेधले लक्ष

मिनिमल ज्वेलरीने वेधले लक्ष

शिवालीने या लुकमध्ये अतिशय मिनिमल ज्वेलरीची निवड केली आहे. गळ्यात पारंपरिक डिझाइनचा नेकलेस, त्यासोबत साधे कानातले आणि हातात बांगड्या अशा मोजक्या दागिन्यांमुळे तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसते. नाकातील नथ तिच्या लुकला खास मराठमोळा स्पर्श देते. दागिन्यांचा अतिरेक न करता केलेली ही स्टाइलिंग अनेकांना आवडली आहे.

सिंपल मेकअपने पूर्ण केला लुक

सिंपल मेकअपने पूर्ण केला लुक

मेकअपबाबतही शिवालीने नैसर्गिक लुकला प्राधान्य दिले आहे. हलका बेस, न्यूड लिपस्टिक, सौम्य आय मेकअप आणि व्यवस्थित आकार दिलेल्या भुवया यामुळे तिचा चेहरा अधिक तजेलदार दिसतो. कपाळावरील छोटी काळी टिकली तिच्या पारंपरिक लुकमध्ये आणखी भर घालते. कोणत्याही प्रकारचा गडद किंवा ओव्हर मेकअप न करता साधेपणातूनही आकर्षक दिसता येते, हे शिवालीने दाखवून दिले आहे.

साडीवर कशी हेअरस्टाईल असावी

साडीवर कशी हेअरस्टाईल असावी

हेअरस्टाइलची निवडही तितकीच खास आहे. मोकळे ठेवलेले हलके कर्ल्स असलेले केस तिच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे वाटतात. केसांची नैसर्गिक स्टाइल आणि हलकी व्हॉल्युम यामुळे संपूर्ण लुक अधिक एलिगंट दिसतो. पारंपरिक साडीसोबत मोकळे केस ठेवण्याचा पर्याय अनेक तरुणींना या लुकमधून नक्कीच प्रेरणा देऊ शकतो.

चाहत्यांचे कमेंट्स

चाहत्यांचे कमेंट्स

शिवाली परबने पिवळ्या साडीतील हे फोटो सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी तिच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला. “खूपच सुंदर दिसतेस”, “साधेपणातलं खरं सौंदर्य”, “मराठमोळ्या लुकला तोड नाही”, “यलो इज युवर कलर”, “साडीमध्ये खूपच ग्रेसफुल दिसतेस” आणि “नेहमीप्रमाणे अप्रतिम” अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे, साध्या मेकअपचे आणि पारंपरिक स्टाइलिंगचे विशेष कौतुक करण्यात आले.

मृणाल पाटील

लेखकाबद्दलमृणाल पाटीलमृणाल पाटील या महाराष्ट्र टाइम्स.कॉममध्ये कार्यरत असलेल्या अनुभवी पत्रकार आणि डिजिटल कंटेंट रायटर असून मीडिया क्षेत्रात त्यांना 11 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. टेलिव्हिजन, डिजिटल मीडिया, प्रिंट पत्रकारिता आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांमध्ये काम करत त्यांनी विश्वसनीय,अभ्यासपूर्ण आणि वाचकाभिमुख लेखनाची भक्कम ओळख निर्माण केली आहे. मनोरंजन, लाइफस्टाईल, फिचर स्टोरीज, ट्रेंडिंग विषय आणि सेलिब्रिटी मुलाखती या विषयांवर सखोल माहिती देणारे लेखन हे त्यांचे प्रमुख कौशल्य आहे.

मृणाल यांनी ‘प्रहार’ वर्तमानपत्रामध्ये प्रवास आणि खाद्यसंस्कृती विषयावर साप्ताहिक लेखन केले आहे. विविध शहरांची संस्कृती, स्थानिक परंपरा आणि खाद्यवैशिष्ट्ये यावर आधारित त्यांच्या लेखांना वाचकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. ‘TV 9’ या प्रतिष्ठित न्यूज चॅनलसाठी त्यांनी अनेक नामांकित कलाकारांच्या मुलाखती घेतल्या असून मनोरंजन पत्रकारितेमध्ये त्यांनी भक्कम अनुभव मिळवला आहे. तसेच आकाशवाणी मुंबईसाठी ‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी व्हॉइस ओव्हरचे काम करण्याचा अनुभव देखील त्यांच्या कार्यात महत्त्वपूर्ण ठरला आहे.

जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी 30 पेक्षा अधिक क्लायंट्सचे यशस्वीपणे व्यवस्थापन केले असून ब्रँड कम्युनिकेशन, कंटेंट स्ट्रॅटेजी आणि मीडिया समन्वय यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. सध्या महाराष्ट्र टाइम्समध्ये ट्रेंडिंग आणि लाईफस्टाईल विषयांवर संशोधनाधारित, अचूक आणि विश्वसनीय माहिती देणारे लेख लिहिणे ही त्यांची विशेष ओळख आहे. तथ्य पडताळणी, विश्वासार्ह स्रोतांचा वापर आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती सादर करण्यावर त्यांचा विशेष भर असतो.

लेखनासोबतच वाचन आणि सोलो ट्रॅव्हलिंग ही त्यांची आवड असून विविध ठिकाणांच्या संस्कृती, जीवनशैली आणि सामाजिक रचनेचा अभ्यास करण्यामध्ये त्यांना विशेष रस आहे. व्यायाम, हॉलिवूड चित्रपट आणि नव्या तंत्रज्ञानाविषयी माहिती मिळवणे हे देखील त्यांचे आवडते छंद आहेत. आपल्या अनुभव, संशोधन आणि निरीक्षणांच्या आधारे वाचकांना दर्जेदार, अचूक आणि विश्वासार्ह माहिती देण्याचा त्या सातत्याने प्रयत्न करतात.

शैक्षणिक पात्रता
मृणाल पाटील यांनी 2017-18 मध्ये मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) पदवी प्राप्त केली आहे. डिजिटल मीडिया ट्रेंड्स, बदलती वाचक प्रवृत्ती आणि माहिती सादरीकरणाच्या आधुनिक पद्धतींचा त्या सातत्याने अभ्यास करतात.आणखी वाचा