Headlines

8th Pay Commission’s Fitment Factor ; 8th Pay Commission : आयोगात 3.833 फिटमेंट फॅक्टरची चर्चा, जर लागू झालं तर कर्मचाऱ्यांची होणार चांदी! समजून घ्या पूर्ण गणित


केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाकडून फार अपेक्षा आहेत. यंदा त्यांच्या पगारात भरमसाठ वाढ होण्याचे चित्र दिसत आहे. कारण आयोगात पगार वाढीला कारणीभूत ठरणाऱ्या फिटमेंट फॅक्टरसंदर्भात चर्चा सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 3.833 फिटमेंट फॅक्टर लावण्यात यावे हा मुद्दा या चर्चेचा मुख्य विषय आहे. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर यांचे पूर्ण लक्ष आठव्या वेतन आयोगाच्या निर्णयाकडे लागून आहे.

फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?

एखाद्या पगार वाढीसाठी फिटमेंट फॅक्टर फार महत्वाचा घटक आहे. जर फिटमेंट फॅक्टरचा आकडा जास्त असेल तर कर्मचाऱ्यांना मिळणारा पगार आणि पेन्शनर्सला मिळणारी पेन्शनही त्यामानाने जास्तच असते. एकंदरीत, फिटमेंट फॅक्टर एक आकडा आहे ज्या दराने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाते. यंदाच्या फिटमेंट फॅक्टरसंदर्भातील चर्चेत आयोगात 3.833 हा आकडा मुख्य मुद्दा म्हंटला जात आहे. म्हणजे जर बेसिक पे 18,000 रुपये असेल तर त्यावर 3.833 या फिटमेंट फॅक्टरने कर्मचाऱ्याला एकूण 69,000 रुपयांपर्यंतची बेसिक पे वाढ मिळू शकते.

उदाहरणार्थ,

बेसिक पे 18,000 रुपये X फिटमेंट फॅक्टर 3.833 = बेसिक पे 68,994 रुपये

पेन्शन 9,000 रुपये X फिटमेंट फॅक्टर 3.833 = पेन्शन 34,500 रुपये

एक गोष्ट लक्षात घ्यावी, फिटमेंट फॅक्टरच्या 3.833 आकड्याची आयोगात सध्या चर्चा सुरू असून, या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप घेण्यात आला नाहीये.

जर फिटमेंट फॅक्टर 3.833 लागू झाला तर..

जर आठव्या वेतन आयोगाने फिटमेंट फॅक्टर 3.833 निश्चित केला तर बेसिक पे 18,000 हून थेट 69,000 चा आकडा गाठेल. पण ही रक्कम कर्मचऱ्याच्या हातात येणार वेतनाची रक्कम ठरेलच असं नाही. कारण बेसिक पे कर्मचाऱ्याच्या हातात येणारी पूर्ण रक्कम नसते. बेसिक पेच्या रक्कमेत इतर भत्ते जसे की महागाई भत्ता, घरभाडे भत्ता तसेच प्रवास भत्ताही जोडला जातो. त्यामुळे जर आयोगाने फिटमेंट फॅक्टर 3.833 लागू केला तर कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन 69,000 हूनही जास्त असू शकते.

एकंदरीत, कर्मचाऱ्याचे अंतिम वेतन हे पे Matrix, महागाईचा भत्ता, घरभाडे भत्ता, प्रवासाचा भत्ता, कर्मचारी कोणत्या पे Level मध्ये आहे, कर्मचारी कोणत्या शहरात आहे तसेच इतर काही भत्ते यांच्या एकूण रक्कमेवर आधारित असेल.

अंतिम निर्णय कधी येणार?

आठव्या वेतन आयोगाकडून अंतिम निर्णय मे 2027 मध्ये येण्याची अपेक्षा आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये आयोगाचे स्थापना करण्यात आली होती, तसेच अंतिम निर्णयासाठी त्यांना 18 महिन्यांचा वेळ देण्यात आला होता. त्या अनुषंगाने मे 2027 मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर, आठव्या वेतन आयोगाच्या या संपूर्ण चर्चेत कर्मचारी आणि पेन्शनर्स यांचेही मुद्दे ऐकून घेतले जात आहेत.

Maharashtra Timesपरदेशी मालमत्ता लपवून ठेवणे पडणार महागात! अर्ध्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी सरकारला द्यावी लागणार; FAST-DS योजना, सोप्या भाषेत समजून घ्यामहागाईच्या भत्त्यात होऊ शकतो बदल?

महागाई भत्ता म्हणजेच डीए हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना पुरवला जातो. तर महागाई सवलत म्हणजेच डीआर पेन्शनर्सला पुरवण्यात येते. या भत्त्यांना शून्यापासून सुरू करण्यात येऊ शकते तसेच पुढे महागाईच्या दरानुसार ती पुढे वाढवण्यात येऊ शकते किंवा नवीन वेतनरचना लागू करताना महागाई भत्ता किंवा महागाई सवलत मर्ज किंवा रिसेट होण्याची शक्यता आहे. अद्याप या निव्वळ शक्यता असून सर्व बाबी सरकारच्या निर्णयानंतरच स्पष्ट होतील.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत