Headlines

8th Pay Commission Final Report On Salary Hike; 8th Pay Commissionचा अंतिम अहवाल कधी? सरकारवर शिफारशींचे बंधन नाही, पगारवाढीचे काय? एरियरवरही प्रश्नचिन्ह


8th CPC Update: संसदेचे मान्सून अधिवेशन सध्या सुरू आहे, जिथे सरकारला विविध मुद्द्यांवर प्रश्न विचारले जास्त असून सत्ताधाऱ्यांनी उत्तरे देणे अपेक्षित आहे. 8वा वेतन आयोग असाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जो 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित असून देशभरातील लाखो कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

तुम्ही केंद्र सरकारचे कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारक असाल आणि 8व्या वेतन आयोगाची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी सरकारने महत्त्वाची अपडेट दिली आहे. 8वा वेतन आयोग आपला अंतिम अहवाल कधी सादर करेल? यावर सरकारने संसदेत पहिल्यांदाच स्थिती स्पष्ट केली. आयोगाचे कामकाज कितपत पूर्ण झालं आहे आणि अहवाल सादर झाल्यावर सरकार अंमलबजावणी कधी करू शकते? हेही सरकारने सांगितले.

Maharashtra Timesघरभाड्यावर TAX सूट हवी असेल तर ही 4 कागदपत्रे जपून ठेवा! बनावट Rent Receipt देणारे आयकर विभागाच्या रडारवर

आठव्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल कधी येणार?

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की, आठव्या केंद्रीय वेतन आयोगाला आपला अहवाल तयार करून सरकारला सादर करण्यासाठी स्थापनेपासून 18 महिन्यांचा कालावधी दिला गेला आहे. आठवा वेतन आयोग 3 मे 2027 पर्यंत वेतनवाढीवरील अंतिम अहवाल सादर करेल, असे अर्थ राज्यमंत्र्यांनी राज्य सभेत सांगितले.

सरकारने संसदेत सांगितले की, 3 नोव्हेंबर 2025 रोजी स्थापन झालेल्या आयोगाला आपल्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी दिला आहे. याशिवाय, आठवा वेतन आयोग स्वतःची प्रक्रिया ठरवण्यासाठी स्वतंत्र आहे आणि या कालावधीत केंद्र सरकारला कोणताही अंतरिम प्रगती अहवाल सादर करण्याची आवश्यकता नाही, असेही सरकारने संसदेला कळवले.

Maharashtra TimesIndia LPG Imports: भारताने इंधन धोरणच बदलले! स्वयंपाकाच्या गॅसच्या पुरवठ्यात होणार बदल, LPG ची चिंता मिटणार? सरकारचा एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार कधी वाढणार?

आठव्या वेतन आयोगाने 2027 पर्यंत अंतिम अहवाल सादर केला तरीही 1 जानेवारी 2026 पासूनच लागू केला जाईल. मे मे महिन्यात अंतिम अहवाल सादर होणार असल्याने आणि त्यानंतर सरकारकडून रिव्यू करून मंजुरी दिल्यानंतर, ज्यासाठी आणखी काही महिने लागण्याची शक्यता आहे, जानेवारी 2026 पासून नवीन नियम लागू होईपर्यंत वाढीव वेतन आणि भत्त्यांची संपूर्ण रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात एकरकमी थकबाकी हस्तांतरित केली जाईल. म्हणजे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना 16-18 महिन्यांची मोठी थकबाकी मिळेल.

वेतन आयोगाने अहवाल सादर केल्यानंतर काय?

आठव्या वेतन आयोगाने सरकारला अहवाल सादर केल्यानंतर केंद्र सरकारकडून त्याचे रिव्यू केले जाईल. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या शिफारसी पूर्णपणे किंवा सुधारणांसह लागू करायच्या याबाबत निर्णय घेईल. लक्षात घ्या की सरकारला तात्काळ अहवालातील शिफारशी लागू करणे बंधनकारक नाही, या प्रक्रियेला साधारणपणे काही महिने लागतात.

गेल्या काही महिन्यांपासून आयोगाच्या अनेक बैठकांचे सत्र पार पडत असून अलीकडेच 10 जुलै रोजी कोलकाता येथे पहिली फेरी संपन्न झाली. त्यानंतर आयोग आता 7 ऑगस्ट रोजी दिल्लीत बैठकांची दुसरी फेरी घेणार असून सप्टेंबरमध्ये चेन्नई येथेही बैठक होईल.